Nagpur Accident News : डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तनिशाला वाहनाने चिरडले

गौरवने स्वतःला कसेतरी सावरले मात्र तनिशा रस्त्याच्या विरुद्ध दिशेने पडल्याने तिला सावरता आले नाही.
accident
accident sakal
Updated on

बुटीबोरी : भावासोबत पुस्तके घेण्यासाठी दुचाकीने जात असताना आडव्या आलेल्या मोकाट जनावरामुळे झालेल्या अपघातात १७ वर्षीय बहीण जागीच ठार झाली. ही घटना बुटीबोरी मार्गावरील पेट्रोल पंप समोर शनिवारी सकाळी १२ च्या सुमारास घडली. तनिशा नीलकंठ कावळे रा. ड्रीम कॉलनी १ बुटीबोरी असे मृताचे नाव तर भाऊ गौरव नीलकंठ कावळे (२१) हा जखमी झाला.

तनिशा हुडकेश्वर नागपूर येथील सेंट पॉल स्कुलमध्ये बारावीत होती. अभ्यासाची पुस्तके घ्यायची असल्याने ती आणि भाऊ गौरव सोबत ॲक्टिवा (६ जी क्र. एमएच ४० सीके १६७६) ने ड्रीम कॉलनीतील घरून बुटीबोरीला निघाले.मार्गावरील एचपी पेट्रोल पंप नजीक दुचाकीसमोर एक ट्रक जात होता. ट्रकने दुभाजक पार केल्यानंतर त्यांच्या दुचाकी समोर एक मोकाट गाय आडवी आल्याने दुचाकीला धडक बसली व गौरवचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले. दोघेही रस्त्यावर कोसळले.

accident
Nagpur Crime : चारित्र्याच्या संशयावरून हातोड्याने पत्नीची हत्या; रात्रभर मृतदेहाजवळ झोपला

गौरवने स्वतःला कसेतरी सावरले मात्र तनिशा रस्त्याच्या विरुद्ध दिशेने पडल्याने तिला सावरता आले नाही. त्याचवेळी मागून भरधाव येणाऱ्या कॉंक्रेट मिलर वाहन (क्र.टी.एस ०६ यु.बी २१५४) च्या मागील चाकाखाली तनिशाचे डोके आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर गौरवला किरकोळ दुखापत झाली. डॉक्टर बनण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तनिशाच्या अपघाती मृत्यूने

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलिसांनी धाव घेतली आणि गौरवला तात्काळ रचना हॉस्पिटलमध्ये हलविले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता रवाना करण्यात आला. वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंद करून वाहन ताब्यात घेण्यात आले.असून पुढील तपास बुटीबोरी पोलीस करीत आहेत.

accident
Nagpur : तलाठी भरतीला एका दिवसाची मुदतवाढ; उद्या रात्री ११.५५ पर्यंत करता येणार अर्ज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()