नागपूर : लोकशाहीत मतदारांना सर्वात मोठे स्थान असल्याने त्यास मतदार राजा असे संबोधले जाते. त्यांच्या मतांवर देशातील सरकार ठरते अन् तरतेही. हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव शुक्रवारी (ता.१९) होत असून पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे.
नागपुरात २६ तर रामटेकमध्ये २८ उमेदवार रिंगणात असून त्यांचे भाग्य जिल्ह्यात ४२ लाख ७२ हजार ३६६ मतदार ठरवणार आहेत. पाच वर्षांतील सरकारची आणि खासदारांची कामगिरी कशी होती, नवे उमेदवार त्यांची जागा घेऊ शकतात काय,
याचा लेखाजोखा घेण्याची संधी पाच वर्षांतून एकदाच मतदारांना मिळते. आज मतदान करून उमेदवार व सरकार निवडण्याची संधी मिळत असल्याने आजच्या दिवशी तमाम राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी प्रत्येक नागरिक हा मतदार राजा ठरतो.
नागपूर आणि रामटेक या दोन्ही मतदारसंघात एकूण ४,५१० मतदान केंद्र आहेत. रामटेकमध्ये २४०५ आणि नागपूरमध्ये २१०५ मतदान केंद्र आहेत. गेल्या महिनाभरात विविध पक्षांच्या नेत्यांनी नागपुरात सभांच्या माध्यमातून मतदारांना साद घातली. सर्वच उमेदवारांनी नवनव्या प्रचारतंत्रातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. सकाळी ७ वाजता मतदान सुरू होणार असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे.
सकाळी सात वाजता मतदान सुरू होईल. त्याच्या दीड तास पूर्वी मॉकपोल करण्यात येणार आहे. यंदा मॉकपोलची वेळ अर्ध्यातासाने वाढवण्यात आली. त्यामुळे उमेदवारांच्या प्रतिनिधिंना ५.३० पूर्वीच केंद्रांवर दाखल व्हावे लागणार आहे.
जिल्ह्यातील ५० टक्के मतदान मतदान केंद्रावरून वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी सीसीटीव्हीचे चित्रही लावण्यात आले आहे. तर रामटेक मतदार संघात एका उमेदवाराल सीसीटीव्ही चिन्हच मिळाले आहे. त्यामुळे आचारसंहिता भंग होईल की नाही, अशी चर्चा होत आहे.
एका बॅलेट युनिटमध्ये जास्तात जास्त १६ नावांचा समावेश असतो. निवडणूक आयोगाने ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे एका बॅलेट युनिटमध्ये नोटासह इतर जास्तीत जास्त १५ उमेदवार राहतील. दोन्ही मतदार संघात १६ पेक्षा उमेदवार असल्याने दोन बॅलेट युनिट राहतील.
मतदान केंद्रात मतदानाच्या दिवशी मोबाईल,स्मार्ट फोन, वायरलेस सेट नेण्यास प्रतिबंध राहील. मतदान केंद्राध्यक्ष, आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था पथक प्रमुख, निवडणुकीच्या कर्तव्यावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रतिबंध लागू राहणार नाही.
आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक व पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या फोटोसह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, कामगार मंत्रालयाने जारी केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र व राज्य सरकार / पीएसयू / पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी दिलेली ओळखपत्रे, खासदार, आमदार यांना जारी केलेले अधिकृत ओळखपत्र.
नागपूर शहर व ग्रामीण भागातील सर्व बुथसाठी दिव्यांग रथ स्थापन करून शहरासाठी झोननिहाय व ग्रामीण भागासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग मतदाराला मतदान करण्यास कुठलीही अडचण आल्यास ८३२९१३१८०८ (प्रफुल्ल गोहते) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
काटोल : २ लाख ७३ हजार ८१४
सावनेर : ३ लाख १४ हजार ६०५
हिंगणा : ४ लाख २४ हजार १५८
उमरेड : २ लाख ९३ हजार ८२९
कामठी : ४ लाख ६६ हजार २३१
रामटेक : २ लाख ७६ हजार ४४८
एकूण मतदार : २० लाख ४९ हजार ८५
दक्षिण पश्चिम : ३ लाख ७६ हजार ४०८
दक्षिण : ३ लाख ७२ हजार ४९५
पूर्व : ३ लाख ८७ हजार ७६२
मध्य : ३ लाख १५ हजार ८४९
पश्चिम : ३ लाख ६५ हजार ३४३
उत्तर : ४ लाख ५ हजार ४२४
एकूण : २२ लाख २३ हजार २८१
नितीन गडकरी - भारतीय जनता पार्टी
विकास ठाकरे - इंडियन नॅशनल काँग्रेस
योगिराज ऊर्फ योगेश लांजेवार - बहुजन समाज पार्टी
किवीनसुका सूर्यवंशी - देश जनहित पार्टी
गरुदाद्री आनंद कुमार - अखिल भारतीय परिवार पार्टी
गुणवंत सोमकुवर - भारतीय जवान किसान पार्टी
टेकराज बेलखोडे - बहुजन मुक्ती पार्टी
दीपक मस्के - बहुजन महा पार्टी
नारायण चौधरी - सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया कम्युनिस्ट
फहीम शमीम खान - माइनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टी
विजय मानकर -आंबेडकराइट पार्टी ऑफ इंडिया
विशेष फुटाणे -बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी
श्रीधर साळवे - भीमसेना
सुनील वानखेडे - राष्ट्र समर्पण पार्टी
सूरज मिश्रा - कुणबी बहुजन स्वराज्य पार्टी
ॲड. संतोष लांजेवार -ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक
आदर्श ठाकूर - अपक्ष
ॲड. उल्हास दुपारे - अपक्ष
धानू वलथरे - अपक्ष
प्रफुल्ल भांगे - अपक्ष
बबिता अवस्थी - अपक्ष
विनायक अवचट - अपक्ष
सचिन वाघाडे - अपक्ष
साहिल तुरकर -अपक्ष
सुशील पाटील - अपक्ष
संतोष चव्हाण -अपक्ष
राजू पारवे शिवसेना(शिंदे गट)
श्यामकुमार बर्वे इंडियन नॅशनल काँग्रेस
संदीप मेश्राम बहुजन समाज पार्टी
शंकर चहांदे वंचित बहुजन आघाडी
आशिष सरोदे - भीमसेना
उमेश खडसे - राष्ट्र समर्पण पार्टी
मंजुषा गायकवाड अखिल भारतीय परिवार पार्टी
गोवर्धन कुंभारे वीरों के वीर इंडियन पार्टी
प्रमोद खोब्रागडेआंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
ॲड. भीमराव शेंडे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी
भोजराज सरोदे - जय विदर्भ पार्टी
सिद्धेश्वर बेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)
रोशनी गजभिये गोंडवाना गणतंत्र पार्टी
विलास खडसे बहुजन मुक्ती पार्टी
सिद्धार्थ पाटील - पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)
संजय बोरकर - महाराष्ट्र विकास आघाडी
संविधान लोखंडे - बळीराजा पार्टी
अजय चव्हाण - अपक्ष
अरविंद तांडेकर - अपक्ष
ॲड. उल्हास दुपारे - अपक्ष
कार्तिक डोके - अपक्ष
किशोर गजभिये - अपक्ष
गोवर्धन सोमदेवे - अपक्ष
प्रेमकुमार गजभारे - अपक्ष
सुरेश लारोकर - अपक्ष
विलास झोडापे - अपक्ष
सुनील साळवे - अपक्ष
सुभाष लोखंडे - अपक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.