Gender equality
Gender equalitysakal

Gender equality : ‘लाडक्या लेकीं’ ची नावे एकवीसशे घरांवर झळकली,नागपूर जिल्ह्यातील २५ गावांमध्ये समानतेचे अनोखे पाऊल

Gender equality : नागपूर जिल्ह्यातील २५ गावांमध्ये २१०० घरांवर मुलींची नावे झळकली. 'मॅजिक बस इंडिया फाउंडेशन'च्या या उपक्रमातून मुलींच्या सन्मानासाठी व सशक्तीकरणासाठी सकारात्मक बदल घडविण्यात आला आहे.
Published on

नागपूर : ‘घराच्या पाटीवर माझे नाव झळकले. याचा आनंद आहे. घरावरील नावामुळे माझ्या अस्तित्वाची झालेली जाणीव आमच्या बहीण-भावंडांसाठी खूप महत्त्वाची आहे’, असे आत्मविश्वासाने बोलत असताना ‘तिला’ तिच्या असण्याची सार्थकता कळली. कळमेश्वर येथील आदर्श मानकर विद्यालयात दहाव्या इयत्तेत शिकत असलेली सुहानी वसंत पांगुळ हे सांगत असताना तिच्या चेहऱ्यावर अनामिक आनंद ओसंडून वाहत होता. आठव्या वर्गातील पल्लवी ढोक, श्रेया डाखोले, धनश्री येवले यांनाही असाच गगण ठेंगणे झाल्याचा अनुभव आला.

Loading content, please wait...