नागपूर ः कोविडमुळे एप्रिल महिना नागपूरकरांसाठी चांगलाच क्लेषदायक ठरला. या एका महिन्यात तब्बल २२८२ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला असून तब्बल एक लाख ८२ हजार ७६८ नागरिकांना कोरोनाने ग्रासले.
सुमारे वर्षभरापासून सर्वत्र कोविडची साथ सुरू आहे. घरोघरी रुग्ण आढळत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर चांगलाच ताण आला आहे. सर्वसामान्यांची बेड, ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर, फेबीफ्लू मिळवण्यासाठी धावपळ सुरू आहे. खाजगी आणि शासकीय रुग्णालने हाऊसफुल्ल झाली आहेत. अद्यापही परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. आजही घरोघरी रुग्ण आहेत. ग्रामीण भागात सुमारे ५० हजारांच्या घरात रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.
खाजगी डॉक्टरांचे अवाढव्य शुल्क भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही. शासकीय रुग्णालयांमध्ये बेड्स नाहीत. मृत्युच्या आकाड्याने अनेकांनी धास्ती घेतली आहे. त्यात आवश्यक औषधे मिळत नसल्याने रुग्णांची चांगलीच परवड होत आहे. काही रुग्णालयांनी व औषध विक्रेत्यांनी चढ्या भावाने विक्री करणे सुरू केले आहे. त्यावर प्रशासनाला अद्यापही नियंत्रण आणता आले नाही.
दुसरीकडे लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाले आहे. रोजगार गेले आहे. एकूणच कोरनाचा फटका सर्वासमान्य नागरिक, व्यावसायिक, कामगार आदी सर्वांनाच फटका बसला आहे. यात आपल्या जिवाभावाचे लोक कोरोनाने हिरावून घेतले आहे.
एप्रिल महिन्याच्या अखरेची शहरातील परिस्थितीत थोडीफार सुधारणार झाली. ३० एप्रिलला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सरासरी टक्केवारी १९.९५ होती. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ती ३४ टक्के होती. त्यानुसार १४ टक्के रुग्ण कमी झाल्याचे दिसून येते. मात्र ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. आजघडीला तब्बल ६२ टक्के रुग्ण ग्रामीणमध्ये पॉझेटिव्ह आढळले आहेत. मृत्यूच्या संख्येतही ग्रामीणमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.