Nagpur Crime: अपघात की घातपात! खेळताना तीन मुलं झाली बेपत्ता, तिघांचेही मृतदेह आढळले कारमध्ये

गेल्या काही दिवसांत नागपुरात मुले बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं आहे
Nagpur Crime
Nagpur CrimeEsakal
Updated on

नागपूरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरमध्ये तीन चिमुकल्यांचे मृतदेह कारमध्ये आढळले आहेत. काल खेळताना ही तिन्ही मुले बेपत्ता झाली होती. नागपूरच्या फारूक नगरमध्ये एका कारमध्ये तिन्ही चिमुकल्यांचे मृतदेह आढळुन आले आहेत. या चिमुकल्यांच्या घातपाताची शंका नागपूर पोलिसांनी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. नागपूर पोलिस त्याबाबत तपास करत आहेत, त्यामध्येच कारमध्ये आता तीन चिमुकल्यांचे मृतदेह आढळल्यामुळे नागपूर हादरले आहे. (Latest Marathi News)

पाचपावली पोलिस हद्दीतील फारुखनगरच्या मोहम्मदीया मशिदीजवळ राहणाऱ्या दोन मुली आणि एक मुलगा शनिवारी (ता.१७) दुपारी अचानक बेपत्ता झाले होते. रविवारी (ता.१८) सांयकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एका नादुरुस्त कारमध्ये त्या तिघांचेही मृतदेह आढळले आहेत. या वृत्ताने परिसरात खळबळ उडाल्याने घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. दरम्यान, त्यांचा गुदमरून मृत्यू झाला की घातपात झाला याचा पोलिस तपास करीत आहे.(Latest Marathi News)

Nagpur Crime
शाळकरी मुलींना मोफत प्रवास कधी? ११ लाख लोकसंख्येच्या सोलापुरात महापालिका परिवहनच्या फक्त २४ बसगाड्या

आलिया फिरोज खान (वय ६), तौसिफ फिरोज खान (वय ४), आफरीन इर्शाद खान (वय ६) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (ता.१७ ) दुपारी बारा वाजता फारुखनगरला लागून असलेल्या खंतेनगर येथील शाळेच्या मैदानावर ही मुले खेळण्यासाठी गेली होती. बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाहीत. यानंतर तिसरी मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती पसरली. हे कळताच कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी फारुखनगर, बाबा बुद्धाजीनगर, वैशालीनगर, टेका, नवी वस्ती, महेंद्रनगर आणि आजुबाजूच्या परिसरात शोध घेतला. मुले कुठेच आढळली नाहीत. यामुळे कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मुलांचा शोध सुरू केला.(Latest Marathi News)

Nagpur Crime
पाऊस लांबल्यास पाणी टंचाई अटळ! ३ टीमएसी बचतीसाठी २९ जूनला सुटणार सोलापूर शहरासाठी पाणी

दरम्यान, रविवारी सायंकाळी पोलिसांनी परिसरात ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवले. सोबत डॉग स्क्वॉड आणि इतर पथकेही परिसरात शोध घेऊ लागली. डॉग स्क्वॉड थेट नादुरुस्त कारजवळ (एमएच१९बीएल८१७४) आल्याने पोलिसांना शंका आली. त्यांनी कारचा दरवाजा उघडून बघितला असता त्यात तिन्ही चिमुकले एकमेकांवर पडलेल्या अवस्थेत आढळून आले.(Latest Marathi News)

बेपत्ता तीन चिमुकल्यांचे मृतदेहच आढळले

घटनेची माहिती मिळताच, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त आयुक्त संजय पाटील, पोलिस उपायुक्त (डिटेक्शन) मुमक्का सुदर्शन आणि अर्चित चांडक यांच्यासह मृतदेहाच्या तपासणीसाठी फॉरेन्सिक आणि वैद्यकीय टिम परिसरात दाखल झाली. त्यांनी तपासणी करून मृतदेह मेयो रुग्णालयात हलवले. पोलिसांनी प्राथमिक तपासात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.(Latest Marathi News)

Nagpur Crime
Uddhav Thackeray : मणिपूरला जाण्याची हिंमत दाखवा; उद्धव ठाकरेंचे मोदींना आव्हान; शिंदेंवरही टीकास्त्र

दुरुस्तीसाठी उभी होती कार

गेल्या दोन महिन्यांपासून ही कार दुरुस्तीसाठी आणून ठेवण्यात आली होती. कारच्या खिडक्यांवर काळी फिल्म असल्याने आतले काहीच दिसत नाही. त्यामुळे खेळताना आत गेली आणि आतून गाडी लॉक झाली. त्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असावा. दरम्यान, तिथून जाता येताना कुणीही त्यांना बघितले नसल्याचे समजते. ते त्या ठिकाणी कसे पोचले हे गूढ आहे.(Latest Marathi News)

परिसराला छावणीचे स्वरूप

तिन्ही चिमुकल्यांचा मृतदेह ‘कोंबिंग ऑपरेशन’ दरम्यान आढळून आल्याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी उसळली. यावेळी नागरिकांना घटनास्थळापासून दूर ठेवण्यासाठी अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. त्यातून परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()