नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव (coronavirus patient) कमी झाला आहे. कोविड हॉस्पिटलध्ये (Covid Hospital) एक खाट उपलब्ध होत नव्हती. आता ९० टक्के खाटा रिकाम्या आहेत. जिल्ह्यात आढळून येणाऱ्या नवीन बाधितांचा नव्हेतर मृत्यूचाही टक्का घसरला. अवघे १९७ बाधित आढळले असून ६ जण दगावले आहेत. यामुळे कोरोनाची दुसरी लाट थोपवली (The second wave of corona stopped) असे म्हणता येईल अशी परिस्थिती आहे. शनिवारी ग्रामीणमध्ये एकही मृत्यू नाही. यामुळे खेडे आज कोरोनामुक्त होते. (3 patient deaths of corona in Nagpur city)
जिल्ह्यात शनिवारी २४ तासांत झालेल्या मृत्यूंमध्ये शहरातील ३, नागपूर जिल्ह्याबाहेरील ३ अशा एकूण ६ मृत्यूची नोंद झाली. आजपर्यंत ८ हजार ९४९ मृत्यू जिल्ह्यात नोंदवले. यात शहरातील मृत्यू संख्या ५ हजार २६३ तर ग्रामीण भागात २ हजार २९७ मृतांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरून रेफर झालेल्या १ हजार ३८९ जणांचा नागपुरात कोरोनाने मृत्यू झाला. यामुळे यांच्या मृत्यूची नोंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे.
शहरात १२३ कोरोनाबाधित तर ग्रामीण भागात ७१ जण बाधित आढळले. ३ जण जिल्ह्याबाहेरचे होते. असे एकूण १९७ नवीन बाधित आढळल्याने आतापर्यंत ४ लाख ७५ हजार ५९६ कोरोनाबाधितांची नोंद झाली. यातील ४ लाख ६२ हजार ३५३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात शहरातील ३४९ तर ग्रामीण भागातील १२२ असे एकूण ४७१ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. आजपर्यंतच्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण ९७.२२ टक्के आहे.
शहरात दिवसभरात ७ हजार २४४, ग्रामीणला २ हजार ७६९ असे एकूण जिल्ह्यात १० हजार १३ संशयीतांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले. यापूर्वी चाचण्यांची संख्या ११ हजार ३५४ होती. आतापर्यंत जिल्ह्यात २८ लाख ५६ हजार ८२६ चाचण्या झाल्या आहेत. यातील २० लाख २० हजार ३४० आर-टीपीसीआर चाचण्या झाल्या आहेत. तर उर्वरित ८ लाख ३६ हजार ४८६ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या झाल्या आहेत. यातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त चाचण्या या खासगी प्रयोगशाळेत झाल्या आहेत.
गृहविलगिकरणातीत २ हजार ९०६ कोरोनाबाधित
जिल्ह्यात ४० दिवसांपूर्वी ७८ हजार कोरोनाबाधित होते. यातील ७० हजारावर कोरोनाबाधित गृहविलगीकरणात होते. मात्र, आते शहरात २ हजार ८३७, ग्रामीणला १ हजार ४५८ असे एकूण जिल्ह्यात ४ हजार २९५ सक्रिय कोरोनबाधित नागपूर जिल्ह्यात आहेत. यातील गंभीर संवर्गातील १ हजार ३८९ रुग्ण मेयो, मेडिकल, एम्स व इतर कोविड सेंटरमध्ये दाखल आहेत. तर उर्वरित २ हजार ९०६ कोरोनाबाधित गृहविलगिकरणात उपचार घेत आहेत.
(3 patient deaths of corona in Nagpur city)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.