Election Impact on Tourism : लोकसभा निवडणुकीमुळे देशभरातील पर्यटन व्यवसायात ३० टक्के घट

Lok Sabha Election Affect Nagpur Tourism : नागरिक पर्यटनालाही गेलेले नसल्याने मतदार थांबला कुठे हा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. निवडणुकीचा पर्यटन हंगामावर विपरीत परिणाम झालेला आहे.
Election Impact on Tourism
Election Impact on TourismSakal
Updated on

Nagpur News : लोकसभेच्या निवडणुकीमुळे पर्यटन व्यवसायाला ब्रेक लागला. परिणामी, पर्यटन व्यवसायाला २५ ते ३० टक्के फटका बसला आहे. कोरोनानंतर पर्यटन व्यवसायाला चांगले दिवस आले होते. त्यावर लोकसभा निवडणुकीमुळे विरजण पडल्याने पर्यटनाच्या मोसमात यावर मरगळ आली होती. मात्र, निवडणुकीचे निकाल आणि मतदान झाल्यानंतर पर्यटनाला जाण्याच्या विचारणा होऊ लागल्यात. पण त्याचे प्रमाण कमी होते.

निवडणुकीचे प्रदीर्घ वेळापत्रक जाहीर केले होते. निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याबद्दलही सरकारकडून जनजागृती करण्यात आली. त्यामुळे मतदानाला प्राधान्य देतील असे वाटत होते. मतदानाच्या टक्केवारीवरून तसे दिसून आलेले नाही. नागरिक पर्यटनालाही गेलेले नसल्याने मतदार थांबला कुठे हा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. निवडणुकीचा पर्यटन हंगामावर विपरीत परिणाम झालेला आहे.

अनेक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पर्यटन हंगामातील शांततेमुळे बजेट बिघडले. हिमाचल प्रदेशात यंदा पर्यटकांची संख्या कमी होती. त्याचे कारण हिमाचल प्रदेशात एप्रिल, मे आणि जून महिन्यात पर्यटन हंगाम असतो. या काळातच निवडणूका होत्या.

उन्हाळ्यात शाळेला सुट्या असल्याने पालकही पर्यटनाला जाण्याचे नियोजन करतात. यंदा मात्र, निवडणुकीमुळे शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांसह इतरांच्याही मनसुब्यावर पाणी फिरले. कारण निवडणूक काळात शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुटी मिळणे अवघड झाले होते.

त्यांना निवडणुकीच्या कामात सहभागी व्हावे लागल्याने उन्हाळ्याच्या सुट्या शहरातच घालवाव्या लागल्या. परिणामी, पर्यटनाला जाण्याचा निर्णय अनेकांनी रद्द केले. काही जणांनी वेळेवर पर्यटनाला जाण्यासाठी चौकशी केली. परंतु, विमानाचे वाढलेले तिकीट दर आणि रेल्वेचे बुकिंग मिळणे कठीण असल्याने अनेकांना नकार द्यावा लागला.

जम्मू कश्मीर, लेह-लद्दाख, सिक्कीम, मेघालय, त्रिपुरा, उत्तराचंल, हिमाचल प्रदेश, दार्जिलींग, डलहौसी, मसुरी या ठिकाणांसह आता नवीन राज्यांकडे पर्यटकांचा कल होता. त्यात अरुणाचल प्रदेश, नागालॅंड आदी राज्ये आहेत. दरवर्षी मार्च महिन्यात बुकिंगचे प्रमाण कमीच असते. एप्रिलनंतर पर्यटनाची तयारी होत असल्याने विविध स्थळांबद्दल विचारणा होते. परंतु, यंदा निवडणुकीमुळे पर्यटन व्यवसायाला फटका बसला. फक्त ७० टक्केच व्यवसाय झाला.

- विश्वनाथ उपाध्याय, अध्यक्ष, टुरिझम इंटरप्रिन्युअर्स नेटवर्क

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com