नागपूर : भरधाव ट्रेलर व अर्टीगा कार समोरासमोर धडकल्याने एकाच कंपनीतील चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये कारचालकासह दोन तरुणींचा समावेश आहे. या घटनेत एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. गुरुवारी मध्यरात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास मिहान परिसरात हा भीषण अपघात घडला.
बालचंद्र उईके (३४) रा. काचोरेनगर, चिंचभवन झोपडपट्टी, पियूष टेकाडे (२५) रा. कोराडी रोड, नेहा गजभिये (२५) रा. दुर्गानगर, वंजारी ले -आऊट, उप्पलवाडी, कामठी रोड, पायल कोचे (२७) रा. महेंद्रनगर, टेका नाका अशी मृतांची तर आशिष सरनायल (२७) रा. चक्रधरनगर, बोखारा, कोराडी रोड असे जखमीचे नाव आहे. हे सर्व मिहान परिसरातील एग्झावेअर टेक्नॉलॉजिक प्रा. लि. कंपनीचे कर्मचारी आहेत. बालचंद्र हा चालकम्हणून कार्यरत होता. कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी येण्या-जाण्याची व्यवस्था केली आहे. गुरुवारी रात्री काम आटोपून सर्वजण एमएच ३१-एटी २५९६ क्रमांकाच्या अर्टीगामधून परतीच्या प्रवासाला निघाले. बालचंद्र वाहन चालवित होता. अगदी काहीच अंतर कापून पुढे गेल्यानंतर मिहान परिसरातील खापरी पुलावरून नागपूरच्या दिशेने जात असताना भरधाव ट्रेलरने समोरासमोर धडक दिली. या अपघातात अर्टीगा अगदी चक्कचूर झाली. यावरून अपघाताची भीषणता लक्षात येते. कारमधील पाचही जण आत अडकून पडले होते. घटनेनंतर आरोपी टिप्परचालक वाहनासह पळून गेला.
हेही वाचा - परराज्यातील धान आढळून आले तर थेट कारवाई करा;...
अपघात झाला ती वेळ मिहान परिसरातील बहुतांश कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या परतण्याची होती. यामुळे कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी वाहने थांबली. घटनेची माहिती मिळताच सोनेगाव पोलिसांचा ताफाही दाखल झाला. संबंधीत कंपनीतील अधिकारीसुद्धा पोहोचले. वाहनात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना कसेबसे बाहेर काढण्यात आले. माहितीनुसार चौघांच्या हालचाली पूर्णपणे थांबल्या होत्या, तर अशिष बेशुद्धावस्थेत होता. त्यांना लागलीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी चौघांना मृत घोषित केले. आशिषवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तक्रारदार सचिन बबन सुटे (३९) रा. शताब्दी चौक यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी गुन्हादाखल करीत आरोपी ट्रेलरचालकाचा शोध सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.