नागपुरात कुख्यात गुन्हेगाराचा 'गेम' करण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांनी आवळल्या चौघांच्या मुसक्या

नागपुरात कुख्यात गुन्हेगाराचा 'गेम' करण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांनी आवळल्या चौघांच्या मुसक्या
Updated on

नागपूर ः कर्ज दिलेली रक्कम परत मागितल्यामुळे कुख्यात गुन्हेगार जुगनूने मित्रालाच संपविण्याची धमकी दिली. मात्र, मित्राने स्वतःचा घात होण्यापूर्वीच जुगनूचा काढण्याचा कट रचला. त्यात जुगनू थोडक्यात वाचला. या प्रकरणी पोलिसांनी खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ही थरारक घटना बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास सदरमधील सेंट जोसेफ शाळेसमोर घडली. निखिल आटोडे (वय ३५ रा.सुभेदारनगर ), संकेत पोरंडवार (वय २५ रा. बिडीपेठ), रोशन राऊत (वय २६ रा. सुभेदारनगर) व बॉबी (वय २७) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

नागपुरात कुख्यात गुन्हेगाराचा 'गेम' करण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांनी आवळल्या चौघांच्या मुसक्या
महागडे रिचार्ज करून त्रस्त आहात? मग तुमच्या आवडीचे हे स्वस्त रिचार्ज बघाच

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुगनू ज्ञानेश्वर वानखेडे (वय ३० रा. संजय गांधीनगर) असे जखमीचे नाव आहे. जुगनू वानखेडे हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध विनयभंग, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. रोशन याचे किराणा दुकान आहे. जुगनू याने रोशन याच्या सासूकडून ५० हजार रुपये उधार घेतले. त्याने ३० हजार रुपये परत केले. २० हजार रुपये देण्यास तो टाळाटाळ करायला लागला.

रोशन याने त्याला पैशाची मागणी केली. जुगनू याने त्याला ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हापासून रोशन धास्तीत होता. जुगनू आपला केव्हाही गेम करू शकते, याची रोशनला खात्री होती. त्यामुळे जुगनूचाच गेम करण्याचा कट रोशनने आखला. बुधवारी रात्री जुगनू हा मोपेडने (एमएच-४९-बीपी-४२५७) ने मित्र राहुल शेंगळे याला जरीपटका भागात भेटायला जात असल्याची माहिती रोशन याला मिळाली.

नागपुरात कुख्यात गुन्हेगाराचा 'गेम' करण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांनी आवळल्या चौघांच्या मुसक्या
निवडणुकीच्या काळात हात जोडून मतं मागणारे लोकप्रतिनिधी कोरोनाकाळात गेले कुठे? नागरिकांचा सवाल

रोशन व त्याच्या तीन साथीदारांनी (एमएच-३१-एस-०३२२) या क्रमांकाच्या कारने त्याचा पाठलाग सुरू केला. जोसेफ शाळेसमोर कारने मोपेडला धडक दिली. जुगनू जखमी झाला. जुगनूचा मृत्यू झाल्याचे समजून चौघेही पसार झाले. घटनेची माहिती मिळताच सदर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जुगनू याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली.

संपादन - अथर्व महांकाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()