Four School Students Drowned in Nagpur : नागपूरच्या रामटेक तालुक्यात चार शालेय विद्यार्थी कालव्यात बुडाले! शोधकार्य सुरू

4 school students drowned in canal : हे विद्यार्थी कालव्यात पोहायला गेले असतांना बुडाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
4 school students drowned in canal
4 school students drowned in canal
Updated on

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील घोटीटोक परिसरात 4 शालेय विद्यार्थांचा नहरच्या ( मोठा कालवा) बुडाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थी सात ते अकरावी या वर्गांमध्ये शिकणारे असून ते इंदिरा गांधी मुलांचे वस्तीगृहाचे विद्यार्थी आहेत.

हे विद्यार्थी कालव्यात पोहायला गेले असतांना बुडाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस आणि तहसीलदार पोहचले असून शोध कार्य सुरू करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.