नागपूर - कुपोषण मुक्तीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असले तरी बालके या दृष्टचक्रातून बाहेर पडत नसल्याचे दिसते. जिल्ह्यात शुन्य ते ५ वयोगटातील मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) ३७७ व अतितीव्र कुपोषित (सॅम) ८१ बालके आढळून आली आहेत. या बालकांना एनर्जी डेन्स न्यूट्रिशन फुड (ईडीएनएफ) आहार देऊन त्यांचे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.
राज्यातील आदिवासी व दुर्गम भागातील नवजात आणि लहान मुलांचे कुपोषण दूर करण्यासाठी शासनाने देशभरात अंगणवाड्या सुरू केल्या. या अंगणवाड्यांमध्ये एकात्मिक बाल विकास योजनेच्या माध्यमातून त्यांचे कुपोषण दूर करण्यासाठी विविध उपाययोजना करून कुपोषित मुलांना पोषण आहार दिला जातो. जिल्ह्यात १ हजार ९५१ अंगणवाड्या व २६१ मिनी अंगणवाड्या आहेत. यात १ लाख १२ हजार १३ वर बालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षणाबरोबरच पोषणही केले जाते.
गेल्या काही महिन्यांपूर्वीपर्यंत अंगणवाड्यांतून बालकांना कडधान्याच्या स्वरूपात पोषण आहार उपलब्ध करून देण्यात येत होता. परंतु अलिकडेच अंगणवाडीतील बालकांना ‘मल्टी मिक्स सिरीयल्स अॅन्ड प्रोटिन्स प्रिमिक्स फुड’ तसेच ‘एनर्जी डेन्स तूर डाळ प्रिमिक्स फुड’ उपलब्ध करून देण्यात येते आहे.
हा आहार प्रशासनाच्या दृष्टीने बालकांसाठी चांगला असल्याचे सांगण्यात येते. पण असे असले तरी जिल्ह्यात मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बालकांच्या आढाव्यात कुपोषित मुलांची संख्या वाढल्याचे दिसून आले. जिल्ह्यात ६ हजार १४५ बालकांचे वजन कमी आहे. तीव्र कमी वजनाची ८३८ बालके आढळून आलीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.