नागपूर : ४६ शिक्षकांनी जमा केले टीईटी प्रमाणपत्र

४ फेब्रुवारीपर्यंत वेळ : प्रमाणपत्राची होणार पडताळणी
TET certificate
TET certificate sakal
Updated on

नागपूर : टीईटी घोटाळाप्रकरणी अटक सत्र सुरू आहे. पोलिसांकडून २०१३ पासूनच्या प्रमाणपत्रांचा तपास सुरू करण्यात आला असून गैरमार्गाने परीक्षा उत्तीर्ण करणारे शिक्षकही पोलिसांच्या रडारवर आले आहे. चार फेब्रुवारीपर्यंत हे प्रमाणपत्र जमा करायचे असून आतापर्यंत ४६ शिक्षकांनी आपले टीईटी प्रमाणपत्र जमा केलेत. हे प्रमाणपत्र शिक्षण विभागातील कर्मचारी घेऊन पुण्याला जाणार आहे.शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांची कारवाई सुरू आहे.

TET certificate
Budget 2022 : पेगॅसिसवर स्वतंत्र चर्चेला वावच नाही - Govt

या प्रकरणात परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या अटकेनंतर धागेदोरे पोलिसांच्या हाती येत आहे. पुणे पोलिसांनी लखनऊमधून एकाला अटक केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे आणि बंगळुरूमधून कंत्राट असलेल्या कंपनीच्या एक पदाधिकाऱ्यालाही अटक केली. सुखदेव डेरे हे टीईटी परीक्षेच्या वेळी नियंत्रक होते. तर, जी.ए. टेक्नॉलॉजीकडे या परीक्षेचे कंत्राट होते. वर्ष २०१८ मध्ये झालेल्या परीक्षेत हा घोटाळा झाल्याचे उघड झाले. पैसे घेतलेल्या उमेदवारांना उत्तरपत्रिकेतील ओएमआर रिकामे सोडण्यास सांगितले जायचे. उत्तरपत्रिका स्कॅन करताना या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका भरल्या जायच्या अथवा त्यांना गुण दिले जायचे.

TET certificate
नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? SC आयोगानं दिले 'हे' आदेश

या आरोपींनी निकालात घोटाळा करून खोटी प्रमाणपत्रे दिल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात समोर आले. प्रथमिक तपासणीत जवळपास ८०० वर विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्याचे बोगस प्रमाणपत्र देण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. टीईटी परीक्षा २०१३ पासून सुरू करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी हा तपास आता २०१३ पासून सुरू केला आहे. पोलिस या मुलांचाही शोध घेणार असल्याची माहिती आहे.

नोकरी येणार धोक्यात?

बोगस मास्तरांची नोकरी धोक्यात येणार आहे. जिल्ह्यात २०१३ पासून ५०० वर विद्यार्थ्यांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केल्याचा अंदाज आहे. यातील ७० च्या जवळपास प्रमाणपत्रधाकर शिक्षक सेवेत असल्याचा प्राथमिक अंदाज शिक्षण विभागाला असून त्यांना प्रमाणपत्र जमा करण्याची नोटीस पाठविण्यात येत आहे. आतापर्यंत ४६ शिक्षकांनी टीईटी प्रमाणपत्र शिक्षण विभागाकडे जमा केल्याची माहिती आहे. या प्रमाणपत्राची सत्यता पुण्यात तपासण्यात येईल. ते बोगस आढळल्यास संबंधितावर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.