टेकाडी (नागपूर) : पारशिवनी तालुक्यातील पाच रुग्णांचा ऑक्सिजनअभावी (Lack of Oxygen) मृत्यू झाला होता. मृतांच्या नातेवाईकांनी जवाहरलाल नेहरू रुग्णालयातील (Jawaharlal Nehru Hospital) कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णालयावर केला होता. प्रकरणी दोषींवर कार्यवाही करण्याची मागणीने जोर धरलेला होता. (5 families not get help from government till now in Nagpur)
माजी पालकमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. मात्र घटनेच्या दोन महिन्यानंतरही कुठलीही शासकीय मदत अद्याप पोहचलेली नसून कुठल्याही सत्ता पक्षातील नेत्यांनी सांत्वना भेट देखील घेतली नसल्याने त्या पाच निष्पाप कुटुंबीयांचा न्यायाच्या प्रतीक्षेत श्वास गुदमरत असल्याची प्रचिती येत आहे.
१३ एप्रिल रोजी झालेल्या पारशिवनी तालुक्यातील कांद्रीस्थित जवाहरलाल नेहरू रूग्णालय येथे ऑक्सिजनअभावी झालेल्या पाच मृतांची कुटुंब अद्यापही शासकीय मदतीपासून वंचित असल्याने पुन्हा एकदा सिस्टीमचा भेदभाव चव्हाट्यावर आलेला आहे. ऑक्सिजनअभावी मृतांमध्ये अमित दिनदयाल भारद्वाज (३१) पटेल नगर कन्हान, कल्पना अनिल कडू (३८), किरण राधेश्याम बोराडे (४७,टेकाडी), हुकुमचंद पी.येरपुडे (५७, रायनगर कन्हान), नमिता श्रीकांत मानकर (३३, रायनगर कन्हान) यांचा समावेश होता.
त्यांच्या मृत्युला दोन महिन्यांच्या काळ लोटलेला आहे. नाशिक घटनेत नंतर तात्काळ मदतीसाठी राज्य शासनाची यंत्रणा कामी लागली. त्याप्रकारची नागपूर जिल्ह्यातील या घटनेसाठी कुठलीही यंत्रणा किंवा कार्यक्षेत्रातील मंत्री, आमदार, खासदार यांनी देखील पीडित कुटुंबीयांकडे पाठ केली असून माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाखांची मागणी थंड बसत्यात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
(5 families not get help from government till now in Nagpur)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.