Pench Tiger Reserve Crocodile Census: पेंच व्याघ्र प्रकल्पातील तोतलाडोह धरण, लोअर पेंच जलाशय आणि जोडलेल्या पात्रात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ५२ मगरींची नोंद झाली आहे. याशिवाय अनेक ठिकाणी कासवाच्या अंड्यांचीही नोंद झाली आहे. गोवळीघाट ते किरीगिसरापर्यंतच्या जलमार्गावर मगरींची सर्वाधिक घनता दिसून आली.
पेंच प्रकल्पात जून २०२३ मध्ये पहिले मगर आणि कासव सर्वेक्षण झाले होते. त्यात ३२ मगरींची नोंद झाली होती. आता २९ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत दुसरे मगर आणि कासव सर्वेक्षण झाले. त्यात मगरींच्या संख्येत वाढ झाली असून ती ५२ वर पोहचली आहे.
पाण्याची पातळी जास्त असल्याने कासवांना पाहता आले नाही. गवताची उच्च घनता आणि वरच्या जलाशयातून करण्यात आलेला पाण्याचा विसर्ग यामुळे मगरींना प्रत्यक्ष पाहणे अवघड झाले होते. तसेच उन्ह शेकण्यासाठी येणाऱ्या जागाही (बास्किंग साइट) पाण्याखाली गेल्याचे निदर्शनात आले. (Latest Marathi News)
यात क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसह २१ स्वयंसेवक सहभागी झाले होते. सर्वेक्षणादरम्यान, मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भाटकर यांनी सहभागींना अशा नागरिक विज्ञान आधारित खात्रीच्या भूमिकेबद्दल माहिती दिली. डॉ. अमित कुमार, डी. पी. श्रीवास्तव आणि प्रेरणा शर्मा यांनी प्रशिक्षण, कार्यपद्धती आणि डेटा संकलन यासारख्या सर्व तांत्रिक बाबी हाताळल्यात. पेंच प्रकल्पाचे प्रभारी क्षेत्र संचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ल, सहाय्यक वनसंरक्षक संदीप भारती आणि पूजा लिंबगावकर यांनी सहभागींचे कौतुक केले. प्रास्ताविक वन परिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण, विवेक राजूरकर यांनी केले.
१५ संरक्षण कुट्यांमधून झाले सर्वेक्षण
सर्वेक्षणाचे उद्दिष्ट मगरींची अंदाजे संख्या व प्रकल्पामधील त्यांचे अस्तित्व माहिती करणे हे होते. मगरी नदीच्या परिसंस्थेतील सर्वोच्च शिकारी आहे. यासाठी तांत्रिक सहकार्य तिनसा इकॉलॉजी फाउंडेशन या संस्थेने केले. पेंच नदीवरील वरच्या आणि खालच्या अशा १५ संरक्षण कुट्यामधून सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणासाठी अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम कव्हर करणारे डबल सॅम्पलिंग ट्रेल्स निवडले गेले.(Latest Marathi News)
सहभागींची प्रत्येक संरक्षण कुटीनुसार दोन जणांच्या संघात विभागणी करण्यात आली. प्रत्येक संघाने किमान तीन व कमाल चार वेळा भ्रमंती केली. त्यासाठी बोटींचा वापर करण्यात आला होता. सहभागींनी मॉडिफाइड बेल्ट ट्रान्सेक्ट ऑन बोट मेथड चा वापर केला. हे एक प्रकारचे सुधारित लाईन ट्रान्सेक्ट आहे. जिथे निरीक्षकांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दृश्यांवर आधारित नदीच्या काठाचे सर्वेक्षण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.