नागपूर : लॉकडाउनमुळे (lockdown) अंगणवाड्या बंद असल्याने मुलांना घरपोच कडधान्य देण्यात येत आहे. या कडधान्याचा उपयोग घरातील सर्वच सदस्य घेत असल्याने त्यांना पुरेसा आहार मिळत नाही. त्यामुळे कुपोषण वाढले (malnutrition increase) आहे, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यात मे महिन्यामध्ये मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) ४५८ व अति तीव्र कुपोषित ९० (सॅम) अशी तब्बल ५४८ बालके कुपोषणाच्या छायेत आढळून आली आहेत. (550 child suffering from malnutrition due to lockdown in nagpur)
अंगणवाड्यांमध्ये एकात्मिक बाल विकास योजनेच्या माध्यमातून त्यांचे कुपोषण दूर करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत पोषण आहारही देण्यात येतो. जिल्ह्यात २३२५ वर अंगणवाड्या आहेत. यात १ लाख ३८ हजारावर ९५३ बालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते. कोरोनामुळे जिल्ह्यात गतवर्षातील मार्च महिन्यापासून अंगणवाड्या बंद आहेत. पण बालकांना पोषण आहाराच्या रूपात कडधान्य त्यांना घरपोच दिले जात आहे, असा दावा महिला बाल कल्याण विभागाचा आहे.
वर्ष २०२१ च्या मे महिन्यात घेतलेल्या आढाव्यात कुपोषित मुलांची संख्या वाढली आहे. मुलांचे वजन, सीबीई कार्यक्रम व पोषण आहाराचे वितरण सुरू असल्याचा दावा विभागाचा आहे. बालकांना कडधान्याच्या रूपात पोषण आहार येत आहे. यात चणा डाळ, मसूर डाळ, तिखट, हळद, साखर, गहू आदींचा समावेश आहे. परंतु, यातून तेल मात्र, काही महिन्यांपासून वगळण्यात आले आहे.
तालुकानिहाय कुपोषणाची स्थिती
तालुका मॅम सॅम
पारशिवनी १६ १२
हिंगणा ५० २०
नागपूर ६४ ०४
मौदा १८ ०३
कामठी ७२ ०७
रामटेक १२ १३
उमरेड १६ ०८
सावनेर ५० ०७
भिवापूर ३२ ०२
नरखेड १८ ०२
कुही १४ ०८
काटोल २६ ०३
कळमेश्वर २९ ०८
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.