नागपूर : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा वेग प्रचंड वाढला आहे. आज मृत्यूदर वाढलेले मृत्यूसत्र थांबण्याचे नाव घेत नसून सलग पाचव्या दिवशी जिल्ह्यात पन्नासावर मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी जिल्ह्यात २४ तासांत ५८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू, तर २ हजार ८८५ नवीन रुग्णांची नोंद झाली.
जिल्ह्यात २६ मार्चपर्यंत दगावणाऱ्या करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५० पेक्षा कमी होती. परंतु, २७ मार्चला ५४ मृत्यू, २८ मार्चला ५८, २९ मार्चला ५५, ३० मार्चला ५४ रुग्णांचे मृत्यू झाले, तर बुधवारी विविध रुग्णालयांत शहरातील ३३, ग्रामीणचे २१, जिल्ह्याबाहेरील ४, अशा एकूण ५८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ३ हजार २४८, ग्रामीण ९९६, जिल्ह्याबाहेरील ८५४, अशी एकूण ५ हजार ९८ रुग्णांवर पोहोचली आहे. शहरात दिवसभऱ्यात १ हजार ८८४, ग्रामीण ९९७, जिल्ह्याबाहेरील ४ असे एकूण २ हजार ८८५ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या १ लाख ७७ हजार ५६०, ग्रामीण ४७ हजार ४४२, जिल्ह्याबाहेरील १ हजार ३६, अशी एकूण २ लाख २६ हजार ३८ रुग्णांवर पोहोचली आहे.
दिवसभऱ्यात शहरात १ हजार ३९४, ग्रामीण ३११ असे एकूण १ हजार ७०५ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या १ लाख ४६ हजार ७३१, ग्रामीण ३४ हजार ८७८ अशी एकूण १ लाख ८१ हजार ६०९ व्यक्तींवर पोहोचली आहे. जिल्ह्यातील हे करोनामुक्तांचे प्रमाण ८०.३४ टक्के आहे.
दिवसभऱ्यात १२४ नवीन रुग्ण रुग्णालयांत -
नागपूर शहरात २८ हजार ३२३, ग्रामीण ११ हजार ८ असे एकूण जिल्ह्यात ३९ हजार ३३१ सक्रीय उपचाराधीन करोना बाधित रुग्ण आहेत. पैकी ३१ हजार ३४२ रुग्णांवर गृह विलगिकरणात उपचार सुरू आहे. तर २४ तासांत नवीन १२४ गंभीर संवर्गातील रुग्णांना विविध रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्याने जिल्ह्यातील रुग्णालयांत दाखल रुग्णांची संख्या ५ हजार १०४ रुग्णांवर पोहोचली आहे.
चाचण्यांची संख्या पुन्हा १६ हजारावर -
होळीच्या सनानिमित्त जिल्ह्यात २९ मार्चला १२ हजार ८९ रुग्ण, ३० मार्चला ४ हजार ६०४ संशयीत रुग्णांच्याच चाचण्यांसाठी नमुने घेण्यात आले होते. परंतु, बुधवारी शहरात १० हजार ४९५, ग्रामीण ५ हजार ५९१ अशा एकूण १६ हजार ८६ संशयीत व्यक्तींचेच नमुने घेतले गेले. दरम्यान मंगळवारी चाचण्यांची संख्या कमी असल्यानेच बुधवारी फार कमी नवीन बाधितांची संख्या दिसत असल्याचे वैद्याकीय क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.