नागपूर : मुलीच्या वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली बांधकाम कंत्राटदाराला ७० लाखांनी चौघांनी गंडविले आहे. याप्रकरणी सतीश गुरूमुखदास लालवानी (वय ५३, रा. महात्मा गांधी स्कुल, जरीपटका) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.