Gudhi Padwa : मराठी नववर्षाला उभारली लेकीच्या जन्माची गुढी; नागपुरात गुढीपाडव्याच्या दिवशी जन्मल्या 39 मुली

दरवर्षी नववर्षाला बाळाच्या जन्माचा आनंद आम्ही साजरा करू, अशा भावना गुढी पाडव्याच्या पर्वावर जन्माला आलेल्या चिमुकल्यांच्या पालकांनी व्यक्त केल्या.
Gudhi Padwa Babies born
Gudhi Padwa Babies borneSakal
Updated on

गुडीपाढवा हा अस्सल मराठमोळा सण. मराठी नववर्षाची सुरवात. या दिवसाची उत्सुकता आणि मजा वेगळीच असते. या दिवसाचा गोडवा म्हणून मराठी नववर्षाच्या पहिल्या १२ तासांत मेयो, मेडिकल, डागा सरकारी रुग्णालयात ७० बाळ जन्माला आले. यात मुलींचा टक्का अधिक असून ३९ मुली जन्माला आल्या आहेत. लेकीच्या जन्मोत्सवाची गुढी उभारून हा सण साजरा करण्याचा संकल्प आईवडिलांनी केला.

मराठी नववर्षाच्या पर्वावर बाळाच्या आगमनाची चाहूल लागल्याचा आनंद झाला. बाराच्या ठोक्‍याला बाळाच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करावा असे विचार मनात आले. जन्माची वेळ सांगता येत नाही. बाराचा ठोका चुकला खरा, परंतु नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवा पाहुणा घरी आला. मुलगी असो वा मुलगा... बाळाच्या जन्माचा आनंद मोठा आहे. दरवर्षी नववर्षाला बाळाच्या जन्माचा आनंद आम्ही साजरा करू, अशा भावना गुढी पाडव्याच्या पर्वावर जन्माला आलेल्या चिमुकल्यांच्या पालकांनी व्यक्त केल्या.

डागा, मेयो आणि मेडिकलसह खासगी रुग्णालयात पहिल्या बारा तासात ७० बाळांचा जन्म झाला. यावरून तासांमध्ये सुमारे दीडशेपेक्षा अधिक बाळ जन्माला आली असावीत असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

Gudhi Padwa Babies born
Nagpur: नागपुरात MBBS विद्यार्थ्याने स्वत:ला कोंडल्याने खळबळ, कारण काय? शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार

डागा रुग्णालयात सोमवारी मध्यरात्रीनंतर साडेबारा वाजता बाळ जन्माला आले. तर मेयोतही याच दरम्यान आले. मेडिकलमध्ये मात्र मध्यरात्री एक १ वाजून १० मिनिटांनी बाळ जन्माला आले. मेडिकलमध्ये पहिल्या बारा तासात २३ प्रसुती झाल्या. यात मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी पहिल्या बारा तासात सर्वाधिक २७ प्रसुती डागा रुग्णालयात झाल्या. तर मेयोत पहिल्या बारा तासात २० बाळ जन्माला आले.

मुलींच्या जन्माचा टक्का वाढला

नागपुरात मेयो, मेडिकल आणि डागा रुग्णालयात पहिल्या बारा तासात ७० अपत्य जन्माला आली. यात ३९ मुली तर ३१ मुले आहेत. दर दिवसांची आकडेवारी बघता खासगी नर्सिंग होममध्ये दिवसाला तीस ते पस्तीस मुले जन्माला येतात. यातही पन्नास टक्के मुली असतात. यावरून मेयो-मेडिकल आणि डागातील बाळांच्या जन्मांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास शहरात ३९ मुली जन्माला आला. पहिल्या बारा तासात मुलींच्या जन्माचा टक्का वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.