Marriage Muhurat : नोव्हेंबर ते डिसेंबर २०२४ पर्यंत ७५ लग्नाचे मुहूर्त; अधिकमासामुळे शुभमंगल लांबले, लवकरच लगीनघाई

२४ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह व त्यानंतर लग्न समारंभांना सुरुवात होईल
75 Marriage Muhurat from November to December 2024 adhik maas marathi news
75 Marriage Muhurat from November to December 2024 adhik maas marathi newsesakal
Updated on

नागपूर : यंदा अधिक श्रावण मासामुळे दिवाळी तसेच लग्नाचे मुहूर्तही पुढे गेले आहेत. साधारणत: दिवाळी ही ऑक्टोबरमध्ये असते. मात्र, अधिकमासामुळे यंदा दिवाळी १२ नोव्हेंबर रोजी आहे. त्यामुळे २४ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह व त्यानंतर लग्न समारंभांना सुरुवात होईल. यंदा नोव्हेंबर ते डिसेंबर २०२४ पर्यंत विवाहाचे ७५ मुहूर्त आहेत. यात ४४ गोरज मुहूर्ताचा समावेश आहे.

डिसेंबरमध्ये ७ गोरज मुहूर्त

डिसेंबरमध्ये एकूण ७ गोरज मुहूर्त आले आहेत. यात ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:५६ वाजता, ८ रोजी सायंकाळी ५:५३ वाजता, १५ रोजी सायंकाळी ५:५६ वाजता, १७ रोजी सायंकाळी ५:५६ वाजता, २० ला सायंकाळी ५:५८ वाजता, २१ रोजी दुपारी १२:३८ वाजता व ३१ ला सायंकाळी ६:०४ वाजता या मुहूर्ताचा समावेश आहे.

आठ मुहूर्त अधिक

नोव्हेंबरच्या शेवटी लग्न मुहूर्ताला सुरुवात होत आहे. मागील वर्षीपेक्षा आठ मुहूर्त यावर्षी अधिक होत आहे. वैशाख महिन्यात एकही लग्न मुहूर्त नाही. त्यामुळे कडक उन्हापासून वऱ्हाडी मंडळीची सुटका होणार आहे.

असे आहेत मुहूर्त

  • नोव्हेंबर : २७, २८, २९

  • डिसेंबर : ६, ८, १५, १७, २०, २१, २५, २६ आणि ३१

  • जानेवारी :२०२४ - २, ३, ४, ५, ६, ८, १७, २२, २७, ३० आणि ३१

  • फेब्रुवारी : १, ४, ६, १२, १३, १४, १७, १८, २६, २७, २८, २९

  • मार्च : ३, ४, ६, ११, १६, १७, २६, २७, ३०

  • एप्रिल : १, ३, ४, ५ १८, २०, २१, २२, २३

मे व जून महिन्यात गुरू - शुक्र अस्तामुळे मुहूर्त नाही

  • जूलै : ९, ११, १२, १३, १४, १५

  • २०२४ तुळशी विवाहानंतर

  • नोव्हेबर : १७, २३, २६, २७

  • डिसेंबर : ३, ५, ६, ७, ११, १२, १४, १५, २०, २३, २४, २६

वैशाखात जास्त शुभमुहूर्त राहतात. त्यामुळे वैशाखात कडक उन्हात लग्न मुहूर्ताची धूम असते. मात्र, यावर्षी गुरू शुक्र अस्तामुळे ३ मे २०२४ ते २८ जून २०२४ पर्यंत लग्नासाठी एकही मुहूर्त नाही.

-डॉ. अनिल वैद्य, आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()