नागपूर : ८० टक्के नागरिक ‘ॲन्टिबॉडीज’युक्त

कोरोनाला पराभूत करण्याची प्रतिकारक्षमता विकसित
नागपूर : ८० टक्के नागरिक ‘ॲन्टिबॉडीज’युक्त
नागपूर : ८० टक्के नागरिक ‘ॲन्टिबॉडीज’युक्तsakal media
Updated on

नागपूर : कळत नकळत अनेकांना कोरोनाची लागण झाली. कोणताही औषधोपचार न करता ते ठणठणीट बरे झाले. मात्र, याची नोंद शासन दरबारी झाली नाही. ही माहिती उपलब्ध व्हावी म्हणून उपराजधानीत आतापर्यंत तीन सर्वेक्षण झाले. ६ हजार १०० जणांचे नमुने घेतले. नागपूर जिल्ह्यातील ८० टक्के नागरिकांनाच्या शरीरात कोरोनाशी लढा देणारी रोगप्रतिकारक शक्ती (ॲन्टिबॉडिज) तयार झाल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. तिसऱ्या सर्वेक्षणात महापालिका हद्दीतील १० झोनमधील प्रत्येकी ४ वार्डातील एकूण ३ हजार १०० तर ग्रामीणच्या १३ तहसीलमधून प्रत्येकी १ मुख्यालय व प्रत्येक तहसीलमधील दोन गावातून एकूण ३ हजार नमुने गोळा केले. यासाठी ६ ते १२, १२ ते १८, १८ ते ६० आणि ६० हून अधिक अशा वयोगटाचे चार गट तयार करण्यात आले होते.

नागपूर : ८० टक्के नागरिक ‘ॲन्टिबॉडीज’युक्त
मुंबईनंतर सर्वाधिक महिला ठाणेदार नागपुरात!

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर सिरो सर्वेक्षणाचा प्रयत्न फसला तर दुसऱ्या सर्वेक्षणातून शहरी भागातील ४०, तर ग्रामीण भागातील २५ टक्के नागरिकांमध्ये ॲन्टिबॉडिज तयार झाल्याचे सिद्ध झाले होते. दुसरी लाट भयंकर होती. हजारो नागरिकांचा बळी गेला. जिल्ह्यातील पाच लाखांवर नागरिकांना कोरोना झाला होता.

तिसऱ्या लाटेचे संकट डोक्यावर असल्याने पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आणि विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी सर्वेक्षण करण्याचा संकल्प सोडला. त्यानुसार सर्वेक्षणाचे महिनाभर नमूने तपासणीचे काम मेडिकलमध्ये सुरू होते. मेडिकलमध्ये पीएसएम विभागप्रमूख डॉ. उदय नारलावार यांच्या नेतृत्वात ही तपासणी झाली. याशिवाय मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले. यामुळेच शहरातील ८४ तर ग्रामीण भागातील ७६ टक्के लोकांमध्ये ॲन्टीबॉडिज तयार झाल्याचे पुढे आले.

पहिला प्रकल्प गुंडाळला

नागपूरच्या शहरी व ग्रामीण भागात जुलै- २०२० मध्ये २,४०० जणांच्या प्रतिबिंड तपासणीचा सिरो सर्वेक्षण झाले होते. सुमारे २,२०० जणांचे नमुने घेत त्याची तपासणीही झाली होती. परंतु दरम्यान या तपासणी झालेल्या किट्सवर अमेरिकन अन्न व औषध प्रशासन विभागाने आक्षेप नोंदवल्याने बंदी घालण्यात आली. त्यामुळे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने या किट्सची मान्यता रद्द केली. त्यामुळे प्रकल्प बंद केला गेला. या प्रकल्पाच्या तपासणीची माहितीही जाहिर केली गेली नाही.

नागपूर : ८० टक्के नागरिक ‘ॲन्टिबॉडीज’युक्त
भाऊ! ‘ई-श्रमकार्ड’ म्हणजे काय?

दुसरे सर्वेक्षण

पहिल्या लाटेदरम्याने जिल्ह्यात किती लोकांना करोना होऊन गेला, याची माहिती घेण्यासाठी नागपुरात दुसऱ्यांदा ऑक्टोंबर २०२० मध्ये दुसरे सिरो सर्वेक्षण झाले. यात तब्बल ४ हजार व्यक्तींची प्रतिपिंड (अँटिबॉडी) तपासणी करण्यात आली. या सिरो सर्वेक्षणासाठी किट्स खरेदी केल्या होत्या. त्यावेळी शहरात ४० तर ग्रामीमध्ये ३५ टक्के लोकांमध्ये ॲन्टीबॉडिज आढळल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.