Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या भव्य प्राण प्रतिष्ठापना; १०८ ज्योतींनी श्री थाडेश्वरी मंदिरात होणार अभिषेक

अयोध्येतील राम मंदिराच्या भव्य प्राण प्रतिष्ठापना उत्सवात अवघे जग सामील झाले आहे. शहराचे वैभव असलेले महालमधील ८०० वर्षे जुने श्री थाडेश्वरी राम मंदिर हे शहरातील सर्वात जुने राम मंदिर आहे.
काळाराम मंदिरांपैकी एक थाडेश्‍वरी मंदिर
काळाराम मंदिरांपैकी एक थाडेश्‍वरी मंदिरSakal
Updated on

Nagpur News : अयोध्येतील राम मंदिराच्या भव्य प्राण प्रतिष्ठापना उत्सवात अवघे जग सामील झाले आहे. शहराचे वैभव असलेले महालमधील ८०० वर्षे जुने श्री थाडेश्वरी राम मंदिर हे शहरातील सर्वात जुने राम मंदिर आहे.

हे प्राचीन मंदिर महाराष्ट्रातील तीन ‘काळा किंवा श्यामल’ (काळ) राम मंदिरांपैकी एक आहे. १३५२ मध्ये श्री रघुनाथ दास महाराजांनी येथे १२ वर्षे एका पायावर उभे राहून साधना केली होती.

महालमधील गांधीसागर तलावाच्या काठावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेजवळ वसलेल्या श्री थाडेश्वरी राम मंदिराचे विद्यमान प्रमुख महंत माधवदास महाराज आहेत. त्यांनी आपली पूजा केवळ या मंदिरापुरती मर्यादित ठेवली नाही.

रामजन्मभूमी आंदोलनात ते कारसेवेचा भाग होते. या कार्यामध्ये वाहून घेतलेल्या नागपुरातील १५० भक्तांचे नेतृत्व त्यांनी केले होते. श्री रघुनाथ महाराजांपासून प्रतिनिधित्व करणाऱ्यांची गणना केल्यास महंत माधवदास महाराज हे १४ व्या पिढीचे प्रतिनिधित्व करत आहेत. महाराष्ट्रातील तीन प्राचीन ‘काळा किंवा श्यामल (काळा) राम’ मंदिरांपैकी हे एक आहे. इतर दोन पैकी नागपूर जिल्ह्यातीलच रामटेक आणि नाशिक येथील प्रसिद्ध काळा राम यांचा यामध्ये समावेश आहे.

२२ ला विविध कार्यक्रम

अयोध्या येथील २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या उत्सवामध्ये हे मंदिर सहभागी होत आहे. येथेही २२ ला अनेक धार्मिक कार्यक्रम होत आहेत. मंदिरात सकाळी १०८ ज्योती असलेल्या भव्य आरतीने ‘अभिषेक’ केला जाईल. तसेच, नागपूर व परिसरातील विविध धार्मिक मंडळे दिवसभर भजन व कीर्तन करणार आहेत. सायंकाळी दीपोत्सव व त्यानंतर पथकाचे वादन होईल.

सर्वात जुनी पंचमुखी हनुमानाची मूर्ती

आंदोलन काळात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी या मंदिर परिसरात बैठका घेतल्या. मंदिरात एकेकाळी भोसले आणि राजे महाराजे दर्शनासाठी येत. मंदिरात ‘पंचमुखी’ हनुमानाची मूर्ती ही देशातील सर्वात जुन्या मूर्तीपैकी एक आहे. तर, दुसरी अलाहाबादला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.