नागपूर - दिवसाढवळ्या घरात शिरून नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याची घटना गेल्या आठवड्यात समोर आली. राज्यात मुलींवर अत्याचार वाढल्याचे चित्र असताना शहरात गेल्या आठ महिन्यात ९० अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली असून जवळपास ७८ मुलींचा विनयभंग झाल्याचे चित्र समोर आली आहे.
बदलापूर येथील शाळेत चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले. त्यानंतर तितकीच धक्कादायक बाब पारडीमध्येही उघडकीस आली. एका अनोळखी व्यक्ती घरात शिरून थेट नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून पळून गेला. चार दिवसानंतर पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी त्याला अटक करण्यात आली.
मात्र, गेल्या आठ महिन्यातील आकडेवारी बघीतल्यास शहरात अल्पवयीन मुली सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीचे विदारक चित्र दिसून येत आहे. केवळ चिमुकल्या आणि अल्पवयीन मुली नाही तर महिलांवरील अत्याचारही गेल्या आठ महिन्यात वाढल्याचे दिसून येत आहे. आठ महिन्यात ११३ महिलांवर अत्याचार तर ११० महिलांचा विनयभंग झालेला आहे.
आठ महिन्यात ८८६ गुन्हे
शहरातील महिलांसंदर्भात गुन्ह्यामध्ये वाढ झाली असून विविध कलमांतर्गत आठ महिन्यात ८८६ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक २५७ गुन्हे महिलांच्या अपहरणाचे आहेत. त्यातून १४ महिलांनी आत्महत्या केलेली आहे. त्यापाठोपाठ नातेवाईक आणि पतीच्या छळापोटी दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या १९३ इतकी आहे. आतापर्यंत त्यातून ३ महिलांनी आपला जीव दिलेला आहे.
असे हेत गुन्हे (१ जानेवारी ते ३१ ऑगस्ट)
हुंड्यासाठी छळवणुकीतून हत्या - ३
अपहरणातून आत्महत्या - १४
नातेवाईक वा पतीचा छळातून दाखल गुन्हे - १९३
अपहरणाचे गुन्हे - २५७
अनैतिक महिला वाहतूक - १३
अठरा वर्षावरील - ११३
अल्पवयीन मुलींवर अत्याचार - ९०
अल्पवयीन मुलींवर विनयभंग - ७८
महिलांवरील अत्याचार - ११३
महिलांवरील विनयभंग - ११०
अनैतिक वाहतूक (प्रतिबंधित)कायदा १९५६ नुसार - १५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.