Nagpur crime : वडिलांकडूनच मुलाच्या अपहरणाचा बनाव

Nagpur crime : वडिलांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या भेटीत पत्नीच्या नातेवाईकांनी मुलाला घेतल्यामुळे अपहरणाचा बनाव केला. पोलिसांच्या तपासात सत्य समोर आल्यानंतर मुलगा सुरक्षित असल्याची पुष्टी करण्यात आली.
Nagpur Crime
Nagpur Crime sakal
Updated on

नागपूर : मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुलाला नागपुरात घेऊन आल्यावर पत्नीच्या नातेवाईकांनी नऊ वर्षाच्या मुलाला परत नेले. याप्रकरणी पतीने चक्क ठाण्यात तक्रार दाखल करीत मुलाचे अपहरण केल्याचा बनाव केला. यामुळे सदर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान पतीला खडसावून विचारणा केल्यावर त्याने सत्य परिस्थिती सांगितल्यावर पोलिसांनी सुटकेचा निश्‍वास सोडला.

शशांक साहनी (रा. जरीपटका) असे मुलाच्या वडिलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशांक यांचे सोनल साहनी (रा. रायपूर) यांचेशी २०१६ मध्ये लग्न झाले. त्यानंतर दीड वर्ष ते दोघेही नागपुरात राहिल्यानंतर त्यांच्या मुलासह रायपूरला सासरी राहायला गेले. मात्र, तिथे त्यांचे एकमेकांशी न पटल्याने काही दिवसांनी त्यांनी नागपूर गाठले. त्यानंतर त्यांनी पत्नीशी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. दोघांचेही घटस्फोटासाठी न्यायालयात प्रकरण सुरू आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शशांक साहनी हे मुलाला भेटण्यासाठी रायपुरला गेले. तिथे त्यांनी मुलाची भेट घेत, त्याच्या वाढदिवसानिमित्त कपडे आणि इतर साहित्य घेऊन देण्याच्या बहाण्याने त्याला घराबाहेर नेले. त्यानंतर ते त्याला घेऊन नागपुरात आले. ही बाब सोनल यांना कळली. त्यांनी याबाबत जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. दरम्यान न्यायालयाची तारीख असल्याने पत्नी नातेवाईकांसोबत नागपुरात आल्या.

ते काम आटोपताच पती मुलाला दुचाकीवरून घेऊन जात असताना, सदरमधील नागपूर बारसमोर त्याच्याकडून मुलाला परत घेत, निघून गेले. दरम्यान यावरून शशांक साहनी यांनी सदर पोलिस ठाण्यात मुलाच्या अपहरणाची तक्रार दिली. नऊ वर्षांच्या मुलाचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनिष ठाकरे यांनी तपासाची चक्रे फिरविली.

दरम्यान नातेवाईक आणि इतरांना विचारणा करताना, त्यांना शशांक यांच्यावर जरीपटका ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली. प्रकरण समोर येताच, काही मिनिटात सत्य समोर आले. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्‍वास सोडला. यावेळी नातेवाईकांशी बोलून घेत मुलगा सुरक्षित असल्याची तपासणीही करून घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.