Pench Tiger Reserve : पेंचमधील कॅम्पमध्ये लवकरच तिसरा हत्ती येणार कर्नाटककडून सकारात्मक संकेत

Pench Tiger Reserve : मादी हत्तीचा शोध अद्यापही सुरूच आहे. या प्रक्रियेला थोडा वेळ लागेल, परंतु वनविभाग वेगाने तयारीला लागला आहे.
Pench Tiger Reserve
Pench Tiger Reserveesakal
Updated on

Pench Tiger Reserve : पेंच व्याघ्र प्रकल्पातील हत्ती कॅम्पमध्ये चार हत्ती आणले जाणार होते. त्यातील पहिल्या टप्प्यात कर्नाटकातून दोन गजराज कॅम्पमध्ये दाखल झाले आहे. गडचिरोलीतील पदमापूर कॅम्पमधून एका मादी हत्ती आणण्यासाठी चमू गेली होती. मात्र, तेथील नागरिकांना विरोध केल्याने अधिकाऱ्यांना रिकामेच परतावे लागले.

दरम्यान, कर्नाटकात सत्ता बदल झाल्यानंतर तेथील सरकारने हत्ती देण्यास नकार दिला होता. आता मात्र, कर्नाटकच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी हत्ती देण्याबाबत सकारात्मकता दाखविल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे कर्नाटकातून लवकरच तिसरा हत्ती येण्याचा शक्यता बळावली आहे. परंतु, मादी हत्ती आणण्याचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे.

Pench Tiger Reserve
Pench Tiger Reserve : पेंच व्‍याघ्र प्रकल्पामधील पर्यटनाचा आलेख उंचावला, वाघोबाच्या दर्शनासाठी वाढतेय गर्दी

हत्ती देण्याबाबत सकारात्मकता दाखविल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे कर्नाटकातून लवकरच तिसरा हत्ती येण्याचा शक्यता बळावली आहे. परंतु, मादी हत्ती आणण्याचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे.

दोन दुबारे आणि एक मोठीगोंडू कॅम्पमधील हत्तींची निवड केली होती. त्यातील दुबारे छावण्यांमधील हत्ती आणले आहेत. हत्ती आणल्यानंतर तिसरा हत्ती आणण्यासाठी वन विभागाची चमू कर्नाटकमध्ये जाणार होती. कर्नाटकमधील निवडणुकीनंतर सत्ता बदल झाला आणि हत्तीचे स्थलांतरण थांबले होते.

आता मात्र, कर्नाटक सरकारकडून पुन्हा हत्तीच्या स्थलांतरणाबद्दल सकारात्मकता दर्शवली आहे. त्यामुळे तिसरा हत्ती पेंच प्रकल्पात येण्याचा मार्ग सुकर होण्याचे संकेत आहेत. मादी हत्तीचा शोध संपलेला नाही. या प्रक्रियेला थोडा वेळ लागेल, परंतु वनविभाग वेगाने तयारीला लागला आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील हत्ती कॅम्पमध्ये दोन हत्ती दाखल झालेले आहेत. लवकरच तिसरा हत्ती कर्नाटकातून आणण्याचे प्रयत्न केले जात आहे. तेथील सरकारसोबत बोलणे झाले असून कर्नाटकच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनीही हत्ती देण्याबद्दल सकारात्मकता दर्शवली आहे.

- महिप गुप्ता, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

जंगलात नियमित गस्त घालणे, दुर्गम भागातील बचाव कार्य तसेच इको टुरिझमच्या उद्देशाने महाराष्ट्राच्या पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने चार हत्ती आणण्यात येणार होते. त्यातील दोन हत्ती दाखल झाले आहेत. मानसिंगदेव वन्यजीव अभयारण्याच्या चोरबाहुली रेंजमध्ये असणाऱ्या हत्ती कॅम्पमध्ये त्यांना ठेवण्यात आलेले आहे. मादी हत्ती आणि एक हत्ती तातडीने आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

- डॉ. प्रभू नाथ शुक्ल, (क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प)

असा आहे हत्ती कॅम्प

बोरबन वनक्षेत्र हत्तींच्या छावणीसाठी उत्तम स्थान आहे. नवेगाव-खैरी धरणातील बॅकवॉटरमध्ये प्रवेश, नैसर्गिक अधिवास, मानवी हस्तक्षेपापासून दूर आणि संरक्षणासाठी एक सुरक्षा झोपडी यासारख्या सुविधा आहेत. हत्तींच्या कॅम्पचे क्षेत्र २ हेक्टरपेक्षा जास्त पसरलेले आहे. तीन नर आणि एक मादी असा चार हत्ती आणण्याची योजना आहे. यापैकी भीमा आणि सुब्रमण्यम हे दोन हत्ती दाखल झालेले आहेत. हे सर्व हत्ती प्रशिक्षित आहेत.

Pench Tiger Reserve
Pune Travel Dairies : मामाचं गाव पुणे असेल तर करा मज्जाच मज्जा, ही ठिकाणे आहेत मुलांसाठी बेस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.