नागपूर : शहरातील फुटपाथशी निगडीत समस्यांवर ‘सकाळ’ने ‘फुटपाथ कुणाच्या मालकीचे’? या वृत्तमालिकेतून २१ सप्टेंबरपासून शहरातील फुटपाथच्या समस्या चव्हाट्यावर आणल्या होत्या. यावर सिटीजन फोरम फॉर इकव्यालिटीचे अध्यक्ष मधुकर कुकडे यांनी ॲड. तुषार मंडलेकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.