नागपूर : ‘आला मेसेज... कर फॉरवर्ड’ने अनेकांना बसतोय झटका

कुपन, गिफ्ट व्हाऊचरचे आमिष : मोबाईलमध्ये ‘स्पायवेअर’
Aala message tax forward to many A shock
Aala message tax forward to many A shocksakal
Updated on

नागपूर : व्हाट्सॲपवर बिग बाजार, डिमार्ट, रिलायन्स, टाटा मोटर्स, जिओ, शॉपिंग मॉलचे कुपन किंवा गिफ्ट व्हाऊचर मिळत असल्याचा मॅसेज गेल्या काही दिवसांपासून फिरत आहे. त्या मॅजेसची कुठलीही शहानिशा न करता अनेक जण ते पुढे फॉरवर्ड करीत. तर काही व्हाऊचरच्या मोहापायी लिंकवर क्लिक करत. यामध्ये कोणतेही गिफ्ट अथवा व्हाऊचर नसून ही निव्वळ सायबर गुन्हेगारांची खेळी आहे. अशा मॅसेज मध्ये ‘स्पायवेअर’ असल्याचे समोर आले आहे.

Aala message tax forward to many A shock
औरंगाबाद : पोलिस भरती परीक्षा; पोलिसासह दोघांना अटक

सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून नामांकित ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांच्या नावाने हाऊचर आणि कुपन मिळत असल्याचा मॅसेज लिंकसह प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हॉट्सॲप आणि फेसबुकवरील ग्रुपवरून तो सतत फॉरवर्ड होत आहे.

ज्याला मॅसेज आला तर तो लगेच फॉरवर्ड करीत आहे. मॅसेजमधील लिंकला क्लिक केल्यास मोफत व्हाउचर मिळतील. ही लिंक उघडल्यानंतर नवीन वर्ष, कंपनीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी किंवा कंपनीला इतके वर्षे झाले असे म्हणून काही सोपे प्रश्‍न विचारले जातात. त्या प्रश्‍नांची उत्तरे दिल्यानंतर कंपनीकडून शॉपिंग कार्ड किंवा गिफ्ट मिळणार असल्याचे आमिष दाखविण्यात येते. प्रश्‍नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्ही विजेता ठरले असून व्हाऊचरची रक्कम जमा करण्याचा बहाणा करीत बँक खात्याची माहिती विचारल्या जात असून यातून फसवणूक करण्यात येत आहे.

Aala message tax forward to many A shock
हिवाळी अधिवेशन : रणनिती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक

काही नामांकित कंपन्यांच्या वेबसाईटसारख्या दिसणाऱ्या अनधिकृत वेबसाईटवरून असे मॅसेज फिरत आहेत. त्या वेबसाईटचे डोमेन आयडी सायबर गुन्हेगारांनी काही दिवसांपूर्वी तयार केले असून फसवणूक करण्याच्या उद्देशानेच असे मॅसेज व्हायरल करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

अती घाई आणि आमिष

जवळपास प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला असून शेकडो व्हॉट्सॲप ग्रूपचे आपण सदस्य असतो. त्यामुळे एका ग्रूपमध्ये मॅसेज आला रे आला की अतिघाईत मॅसेज अन्य ग्रूपवर फॉरवर्ड करण्यात येतात. ज्यांना असा फसवा मॅसेज मिळतो तेसुद्धा कोणतीही खात्री न करता क्लिक करून लगेच प्रश्‍नांची उत्तरे देत बॅंक अकाऊंटची माहिती देतात.

Aala message tax forward to many A shock
जया बच्चन वाद; 2024 नंतर उलटी गंगा वाहू लागेल, राऊतांचे संकेत

"ईमेल किंवा मॅसेजद्वारे गिफ्ट व्हाउचर किंवा बक्षिसाच्या नावाने येणाऱ्या मॅसेजच्या लिंक उघडल्यास मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये व्हायरस घुसून आतील माहिती सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहचू शकते. आपल्या मोबाईल मधील काँटॅक्ट, व्हिडीओ, फोटो इत्यादीचा गैरवापरहोवू शकतो. अशा लिंक मधील किरकोळ प्रश्नांची उत्तरे देवून जिंकलो तर लाखोची बक्षिसे देऊन कंपन्या कशाला बरबाद होतील याचा विचार करा. अशा बक्षीस योजना मॅसेजची लिंक क्लिक करू नका. लिंक्समध्ये कोणतीही बँक खात्या संबंधित माहिती भरू नका, अन्यथा मोठे नुकसान होवू शकते."

- केशव वाघ (सायबर क्राईम, नागपूर पोलिस)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.