हमारी मांगे पुरी करो!सरकार दरबारी आवाज पोहोचविण्यासाठी काळ्या फिती लावून त्या करणार काम

aasha
aasha
Updated on

नागपूर  : सारा देश कोरोना आजाराशी झुंज देतो आहे. यामध्ये आरोग्य कर्मचा-यांचे मोठे योगदान आहे. सगळे नागरिक सुरक्षिततेसाठी आपआपल्या घरात असताना ही मंडळी जीवावर उदार होऊन सेवा देत आहेत. आशा वर्कर्सही त्यापैकीच. मात्र त्यांच्याही काही मागण्या आहेत. विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे 11 ते 13 मेपर्यंत काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने दखल घेतली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा संघटनेने दिला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरी व ग्रामीण भागात आशा व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. त्यांना निश्‍चित मानधन मिळावे, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा आणि मानधनही वाढवण्यात यावे, अशी मागणी कृती समितीने केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आशा व गटप्रवर्तकांनी जिवाची पर्वा न करता गावपातळीवर काम केले. राज्य शासनाने 16 सप्टेंबर 2019 ला मानधनात 2 हजार रुपये वाढ केली. परंतु, गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ केली नाही. सेविकांना दरमहा पाच हजार व गटप्रवर्तकांना दरमहा दहा हजार रुपये ठरावीक वेतन द्यावे. लॉकडाउन काळात गटप्रवर्तकांना दरमहा पाचशे रुपये मिळावेत. 30 रुपये प्रोत्साहनपर भत्ता मिळावा. आशा गटप्रवर्तक व नर्सेस यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा. सर्व कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट उपलब्ध करावी.

सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, आदी विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरता राज्यभरातील आशा गटप्रवर्तक व नर्सेस यांनी काळ्या फिती लावून काम केले. याच पद्धतीने तीन दिवस काम करणार. मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, अशी माहिती आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनचे अध्यक्ष राजेंद्र साठे, महासचिव प्रीती मेश्राम, सचिव रंजना पौनीकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.