Accident News: भरधाव ट्रकची कारला धडक; अपघातात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसासह आणखी एकाचा जागीच मृत्यू, २जण जखमी

यवतमाळमध्ये नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा आणि ट्रक चालकाचा मृत्यू
Accident News
Accident NewsEsakal
Updated on

यवतमाळमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कर्तव्य बजावत असणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्यासह आणखी एका वाहन चालकाचा या अपघातात मृत्यू झाला आहे. एका ट्रक चालकाने पोलीस जिपला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नागपूर तुळजापूर राष्ट्रीय मार्गावर वाहनांची तपासणी करणाऱ्या हायवे पोलिसांच्या वाहनाला भरधाव आयशर ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एक पोलीस कर्मचारी व आयशरचा चालक यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन पोलीस कर्मचारी देखील गंभीर जखमी झाले आहे. या अपघातानंतर बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे.

Accident News
Accident News: २० ते २५ प्रवाशी असलेल्या बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात; घटनेत एका महिलेचा मृत्यू

नागपूर तुळजापूर राष्ट्रीय मार्गावरील कोसदणी येथील घाटात हा भीषण अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडला आहे. महामार्ग पोलीस यावेळी एक ट्रक थांबवून त्याची कागदपत्रे तपासत होते. त्यावेळी मागून आलेल्या भरधाव आयशर ट्रकने हायवे पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक दिली आहे.

Accident News
Bhor News : नीरा देवघर धरणामध्ये मोटार कोसळून दोघांचा मृत्यू

दरम्यान तपासणीसाठी रस्त्यावर उभ्या असलेला पोलीस कर्मचारी हा तपासणीसाठी थांबलेला ट्रक आणि आयशर यांच्यामध्ये चिरडला गेला. या अपघातत संजय नेटके या पोलीस कर्मचाऱ्याचा आणि आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. यवतमाळच्या खाजगी रुग्णालयात जखमींवर उपचाक सुरू आहेत.

Accident News
Malkapur Bus Accident: मलकापुरमधील अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल, मृतांच्या नातेवाईकांना मोठी मदत जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.