अरेरे... मुलींच्या लग्नाचे सुख पाहण्याआधीच मृत्यूने कवटाळले, जाणून घ्या सविस्तर घटना

Accidental death of a man pickup vehicle collision
Accidental death of a man pickup vehicle collision
Updated on

बाजारगाव (जि. नागपूर) : येथून पाच किमी अंतरावर असलेल्या गरमसूर येथे राहणारे उकंडराव गोविंदराव राठोड ( वय ४४) यांना दोन मुली व एक मुलगा व पत्नी असा आनंदी परिवार. एकीकडे संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिनाचा आनंद साजरा होत असताना राठोड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार १५ आॅगस्टला सकाळी उकंडराव राठोड आपल्या दुचाकी क्र. एम. एच. २७ बी.इ. ३९७० ने जवळच असलेल्या काथलाबोडी येथे काही कामानिमित्त गेले होते. परत येत असताना स्टार की पाइंट रिसोर्टसमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकअप गाडी क्र.एम.एच.४० बी. एल. ६९६७ ने जोरात धडक दिली. त्यांना उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

एकीकडे लाडात वाढविलेल्या दोन मुली व एक मुलगा नावे किरण (२३), व आरती (२२) या दोन्ही मुलींचे लग्न मोठ्या थाटामाटात करू, हा आनंद मनात असताना कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे लग्न पुढील वर्षी करू म्हणून सहा मे रोजी होणारा लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला. आगामी काळात घरी होणाऱ्या लग्नकार्याची तयारी सुरू असताना अपघातात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दु:खाचे सावट पसरले. एक मुलगा केलटेक्स कंपनीत काम करतो. त्यामुळे घरातील संपूर्ण जबाबदारी व एकीकडे वडिलांचे अपघाती निधन यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य दु:खाच्या गर्तेत आहेत.
 

सीसीटीव्ही कॅमेरा होता म्हणून... 


आरोपी दुचाकीला धडक देऊन फरार झाला. बाजारगाव ते डोरली मार्गावर सकाळी खूप वर्दळ असल्याने आरोपीचा शोध घेणे कठीण होते. परंतु, जवळच असलेल्या ‘स्टार के पॉइंट रिसॉर्ट’चा रोडवर असलेल्या कॅमेऱ्यावर पोलिसांची नजर गेली. सीसीटीव्ही तपासात आरोपीचा चेहरा दिसून आला. आरोपी अमोल गजानन डोळे, रा. बाजारगाव याला व यांच्या गाडीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ढगे करीत आहेत.
 

अरुंद रोडने घेतला जीव 


डोरली मार्ग नागपूर-काटोल व नागपूर-अमरावती या महामार्गाला जोडला गेला आहे. त्यातच या रोडवर रिसॉर्ट, अनेक फार्महाऊस आहेत. हा रस्ता हा एवढा अरुंद आहे की एक चारचाकी वाहन जर रोडवर उभे असेल तर बाकीच्या वाहनांना मार्गच मिळत नाही. त्यामुळे परिसरात अपघात नित्याचेच झाले आहेत. रस्ता रुंदीकरणाबाबत स्थानिक सरपंच, ग्रामसेवक आदींना निवेदन देण्यात आले. परंतु राज्य महामार्ग मंत्रालयाने याकडे कानाडोळा केला. यातच निरपराध उकंडराव यांना जीव गमवावा लागला. आतातरी रस्ता रुंदीकरण व्हावे, अशी मागणी होत आहे. 

संपादन : अतुल मांगे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.