Samruddhi Mahamarg : समृद्धीवरील अपघातांचा आलेख घसरला, नागपूर विभागात मृतांचीही संख्या निम्म्यावर

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या कमी झाली असून, नागपूर विभागात मृतांची संख्या निम्म्यावर आली आहे. यावर्षी ऑगस्टपर्यंत ८० अपघातांमध्ये २६ जणांचा मृत्यू झाला आहे.
Nagpur Mumbai Samruddhi Mahamarg
Nagpur Mumbai Samruddhi Mahamarg sakal
Updated on

नागपूर : राज्याचा विकासाचा महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्ग मृत्यूचा महामार्ग असल्याचे चित्र असताना यावर्षी महामार्गाच्या नागपूर विभागात अपघातात कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत मृतांची संख्याही निम्म्यापेक्षा कमी झालेली आहे.

मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग खुला झाल्यावर वर्षभरात महामार्गावर ११०० पेक्षा अधिक अपघात घडले होते. त्यात १३२ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. यामध्ये प्रामुख्याने नागपूर विभागात १२४ अपघातांमध्ये ४१ प्राणांकित अपघातांमध्ये ८० जणांना जीव गमवावा लागला होता. याशिवाय ८३ जण गंभीर तर २३७ जणांना किरकोळ दुखापती झाल्या होत्या.

विशेष म्हणजे, १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट यादरम्यान ८४ अपघातामध्ये २७ प्राणांकित अपघातांमध्ये ६५ जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय ५७ जण गंभीर तर १४४ जण किरकोळ जखमी झाले होते. दरम्यान यावर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत ८० अपघातामध्ये २१ प्राणांकित अपघातामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. ५९ जण गंभीर तर १४४ जण किरकोळ जखमी झाले आहे.

१ लाख १७ हजार ३६२ वाहनांची तपासणी

महामार्ग पोलिसांच्या वतीने समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे कारण शोधून त्यासंदर्भात उपाययोजना राबविण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने गेल्या आठ महिन्यात पोलिसांनी १ लाख १७ हजार ३६२ वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये ३८ हजार ३८९ वाहन चालकांची ब्रेथ अनालयझरच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. त्यातील दोन चालकांवर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, ३ हजार ८९८ वाहनांना त्यांच्या वाहनाच्या टायरची स्थिती व्यवस्थित नसल्याने तर ८८२ वाहनांना प्रवाशांच्या अधिक क्षमतेमुळे परत पाठविण्यात आले. याशिवाय नियमित वाहनांच्या टायरमधील हवा आणि वाहनांचा स्थितीचीही तपासणी करण्यात येते.

सकाळचे तीन तास सर्वाधिक अपघात

समृद्धी महामार्गावर सकाळचे तीन तासात सर्वाधिक अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सकाळी सहा ते नऊ या दरम्यान एकूण अपघाताच्या ३५ टक्के अपघात होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय सकाळी ६ ते १२ या दरम्यान ९० टक्के अपघात होत असल्याचेही दिसून आले आहे.

अशी आकडेवारी (नागपूर विभाग) २०२३

एकूण अपघात १२४

  • प्राणांकित अपघात ४१

  • मृत्यू ८०

  • गंभीर जखमी ८३

  • किरकोळ जखमी २३७

  • ०२४ (ऑगस्टपर्यंत)

एकूण अपघात ८०

  • प्राणांकित अपघात २१

  • मृत्यू २६

  • गंभीर जखमी ५९

  • किरकोळ जखमी १४४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.