नागपूर : प्रशासनाची चिंता वाढली; तिसऱ्या लाटेचा प्रकोप सुरु

नवे २४०७ बाधित; ७५६ कोरोनामुक्त
Third Wave Of Corona
Third Wave Of Coronasakal
Updated on

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाच्या (Corona)नव्या व्हेरियंट असलेला ओमिक्रॉनचा (Omicron) उद्रेक कमी झाला असून कोरोनाच प्रकोप वाढला आहे. यामुळे कोरोनाची तिसरी लाट घोषित (Third Wave Of Corona)झाली असून कोरोनामुक्तांच्या तुलनेत कोरोनाबाधितांचा आकडा दर दिवसाला चांगलाच फुगत आहे. मागील २४ तासांमध्ये अवघे ७५६ जणांनी कोरोनावर मात केली तर एकाच दिवशी २ हजार ४०७ जण जिल्ह्यात झालेल्या ११ हजार २९६ चाचण्यांतून कोरोनाबाधित आढळले. कोरोनामुक्तांच्या तुलनेत तिपट्टीपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे, ही चिंताजनक बाब आहे.

Third Wave Of Corona
लग्नास नकार दिल्याने चिडली प्रेयसी; प्रियकरावरच केला चाकू हल्ला

जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्याही दररोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. मंगळवारी (ता.१८) रोजी कोरोनामुक्तांच्या तुलनेत बाधितांची तिपटीहून अधिकने नोंद झाली आहे. यात शहरातील जिल्ह्यात ११ हजार ५७३ चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये शहरात ७ हजार ९०३ तर ग्रामीणमध्ये ३ हजार ३९३ चाचण्यांचा समावेश आहे. त्यापैकी तब्बल २ हजार ४०७ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळले. यामध्ये शहरातील १ हजार ९६५ तर ग्रामीणमधील ३९३ व जिल्ह्याबाहेरील ४९ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख १३ हजार ९३० वर गेली आहे.

मागील २४ तासांमध्ये शहरातून ६६०, ग्रामीणमधून ९६ अशा एकूण ७५६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण कमी आहे.

नवे २४०७ बाधित; ७५६ कोरोनामुक्त

मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झाला नाही, यामुळे कोरोनामृत्यूचे प्रमाण स्थिर आहे. कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या १०१३२ आहे.

Third Wave Of Corona
धक्कादायक! पत्नी, दोन मुलांचा गळा चिरून खून; पतीने केली आत्महत्या

जिल्ह्यात १४ २९६ सक्रिय बाधित

जिल्ह्यात तिसऱ्या लाटेचा प्रकोप सुरु असून दररोज रुग्णसंख्येचे नवनवीन विक्रम नोंदविले जात आहेत. जिल्ह्यात तीन महिन्यांपूर्वी केवळ ३९ कोरोनाबाधित होते. मात्र १ ते १८ जानेवारी दरम्यान जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढली आहे. जिल्हात आता १४ हजार २९६ कोरोनाबाधित आहेत. यापैकी शहरात ११ हजार ५१५ सक्रिय कोरोनाबाधित आहेत. तर ग्रामीण भागात २ हजार ६४६ कोरोनाबाधित आहेत. यात जिल्ह्याबाहेरचे १३५ कोरोनाबाधित आहेत.

आयटीआयचे सहा विद्यार्थी कोरोनाबाधित

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) सहा विद्यार्थ्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अन्य विद्यार्थ्यांचीही चाचणी सुरू केली आहे. येथील विद्यार्थ्यांसह शिक्षक, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडली आहे. वाढत्या करोनामध्ये ‘आयटीआय’ सुरू असल्याने विद्यार्थ्यांना धोका असल्याने वृत्त सकाळने प्रकाशित केले होते. राज्यात १० जानेवारीपासून सर्व शाळा, महाविद्यालये करोना व ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असल्यामुळे बंद करण्यात आल्या आहेत. असे असताना आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मात्र उपस्थिती अनिवार्य करण्यात आली. शासनाच्या या चुकीच्या निर्णयामुळे आयटीआयच्या विद्यार्थ्यांना करोना संसर्ग झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()