Jilha Parishad Nagpur: जिल्हा परिषदेवर आता नियुक्त होणार प्रशासक!

Jiilha parishad : प्रभाग रचना आणि आरक्षणाचा कार्यक्रम नवीन सरकारकडून होण्याची अपेक्षा आहे.
jilha parishad nagpur
jilha parishad nagpursakal
Updated on

नागपूर : जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपण्‍यासाठी चार महिने शिल्लक आहे. अद्याप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला नाही. नवीन सरकारकडून कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने त्याला नवीन वर्षच उजेडणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर काही काळ प्रशासकाची नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात होत आहे.

जानेवारी २०२५ मध्ये जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपणार आहे. पूर्वीच्या निवडणुका बघता आतापर्यंत प्रभाग रचनेचा कार्यक्रम येणे अपेक्षित होते. परंतु अद्याप तो आला नाही. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नानंतर राज्य सरकारने प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्याचे अधिकार स्वतःकडे घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.