मुख्याध्यापिकेने दिला सल्ला; मुलांनी भिक्षा मागून एका मुलाच्या शाळेची भरली फी

उपजीविकेसाठी शहरातील उकिरडे शोधणे, भिक्षा मागण्यासोबत शिक्षण घेण्याचे काम टोलीतील मुले करतात.
Childrens
ChildrensSakal
Updated on
Summary

उपजीविकेसाठी शहरातील उकिरडे शोधणे, भिक्षा मागण्यासोबत शिक्षण घेण्याचे काम टोलीतील मुले करतात.

नागपूर - उपजीविकेसाठी शहरातील उकिरडे शोधणे, भिक्षा (Begging) मागण्यासोबत शिक्षण (Education) घेण्याचे काम टोलीतील मुले (Child) करतात. मात्र शनिवारी टोलीतील भीक मागणाऱ्या पोरांनी सुयोगनगर, छत्रपतीनगर चौकातील भिक्षा मागून एका मुलाच्या शाळेची फी (School Fee) भरली. शाळेची फी भरण्यासाठी टोलीतील मुलांनी भिक्षा मागून शैक्षणिक मदत (Educational Help) केली आणि समाजासमोर मोठा आदर्श घालून दिला. टोलीतील मुलांनी अरिहंत राजेंद्र बागडे या विद्यार्थ्याला मदत केली.

अरिहंत रिंग रोडवरील एका खासगी कॉन्हेंटमध्ये पाचव्या वर्गात शिकतो. पण, कोरोनाच्या काळात त्याच्या वडिलांची नोकरी गेली. आई दोन घरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पुढच्या शिक्षणासाठी शाळेची फी भरणे शक्य नसल्याने त्यांनी मुलाला सरकारी शाळेत टाकण्याचा निर्णय घेतला. सरकारी शाळेत दाखलाही घेतला, पण जुन्या शाळेतून टीसी आणल्याशिवाय दाखल विद्यार्थ्याची नोंदणी होणार नव्हती, असे शाळेने सांगितले. त्यामुळे अरिहंतची आई संगीता यांनी टीसीसाठी शाळेत अर्ज केला. पण, मुख्याध्यापिकेने सांगितले की शाळेची साडेनऊ हजार रुपये फी भरा, नंतरच शाळा सोडल्याचा दाखला न्या. यामुळे पालकांनी सामाजिक कार्यकर्ते खुशाल ढाक यांच्या माध्यमातून मुख्याध्यापिकेला पुन्हा विनंती केली.

Childrens
...अन् राहुल बजाज यांची वर्धेची भेट ठरली शेवटची

मात्र मुख्याध्यापिकेने भिक्षा मागा, पण शाळेची फी भरा, असा सल्ला दिला. त्यानुसार ढाक यांनी याच शाळेपुढे शनिवारी भीक मागायला सुरुवात केली. भिक्षेच्या रूपात आलेला साडेचार हजार रुपयांचा निधी गोळा झाला. उर्वरित पैसे देत शाळेची पूर्ण फी भरली.

मुख्याधापकांचा सल्ला ऐकला

यावेळी रस्त्यावर सुरू असलेला भिक्षा मागण्याचा प्रकार बघून पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांना सारा प्रकार सांगितला. शाळेच्या मुख्याध्यापिकेने भिक्षा मागा आणि शाळेची फी भरा असा सल्ला दिला. यामुळे भिक्षा मागितली आणि एका मुलाचे शिक्षण सुरू ठेवण्यास मदत केली, अशी विनम्र प्रतिक्रिया पोलिसांपुढेही टोलीवाला मास्त खुशाल ढाक यांनी दिली. यामुळे पोलिसांनी यापुढे असे प्रकार करू नका असे सांगत त्यांना सोडून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.