नागपूर : अपघात, प्रदिर्घ आजार, मेंदूशी निगडीत दुखापती, व्याधींवर भौतिकोपचार (फिजिओथेरेपी) वरदान ठरते. हाच उद्देश ठेवून शहराचा वाढता विस्तार आणि दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांची गरज लक्षात घेता महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने शहरात चार भौतिकोपचार केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही केंद्र सेवेत दाखल होतील. येथे गरजूंना आवश्यकतेनुसार माफक दारात सेवा उपलब्ध होईल.