Loksabha Election 2024 : मोदींनंतर आता राहुल, प्रियांका विदर्भात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पूर्व विदर्भातील निवडणुकीच्या आखाड्यात आता काँग्रेसचे स्टार प्रचारक राहुल गांधी आणि प्रियांका गांधी उतरणार आहेत. राहुल गांधी यांची सभा शनिवारी साकोली येथे तर प्रियांका गांधी यांची सभा सोमवारी चंद्रपूर येथे आयोजित केली आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal
Updated on

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पूर्व विदर्भातील निवडणुकीच्या आखाड्यात आता काँग्रेसचे स्टार प्रचारक राहुल गांधी आणि प्रियांका गांधी उतरणार आहेत. राहुल गांधी यांची सभा शनिवारी साकोली येथे तर प्रियांका गांधी यांची सभा सोमवारी चंद्रपूर येथे आयोजित केली आहे. विशेष म्हणजे संघभूमी अशी ओळख असलेल्या नागपूरमध्ये काँग्रेसच्या एकही बड्या नेत्याची सभा नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघामध्ये १९ एप्रिलला मतदान होणार आहे. रामनवमी (१७ एप्रिल) हा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने पुढच्या आठवड्यात मोठे नेते विदर्भात येण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या उमेदवारांकडून सर्वाधिक मागणी राहुल गांधी यांना आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपले वजन वापरून त्यांना भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात आणले आहे. येथे काँग्रेसने डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. नाना यांनी त्यांच्या विजयाची ‘गॅरंटी’ घेतली आहे. भाजपने येथे खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

Loksabha Election 2024
Bhavana Gawali : खासदार गवळी आजपासून प्रचारात दिसतील ; मुख्यमंत्री

प्रियांक गांधी चंद्रपूरच्या महायुतीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारासाठी सोमवारी (ता.१५) येत आहेत. चंद्रपूर शहरात त्यांची सभा आयोजित केली आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता.

वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी यांनी येथून उमेदवारी मागितली होती. आमदार असलेल्या प्रतिभा धानोरकर यांनी आपणच लढणार असे जाहीर केले होते. २०१९ मध्ये चंद्रपुरातून बाळू धानोरकर हे काँग्रेसचे राज्यातील एकमेव उमेदवार निवडून आले होते. मात्र, त्यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या जागेवर प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नाना पटोले यांचीसुद्धा धानोरकर यांनाच उमेदवारी द्यावी यासाठी आग्रही होती. धानोरकर यांच्या विरोधात भाजपने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरवले आहे.

खरगे दीक्षाभूमीवर

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना अभिवादन करण्यासाठी १४ तारखेला दीक्षाभूमीवर येत आहेत. ते विकास ठाकरे यांच्यासाठी सभा घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही दीक्षाभूमीवर येतील, अशीही चर्चा आहे. परंतु, त्यांच्या दौऱ्याबाबत अधिकृत पुष्टी मिळू शकली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.