Nagpur Health : उपराजधानीतील हवा प्रमाणापेक्षा अधिक प्रदूषित,गुणवत्ता निर्देशांक ७४ : हृदयाच्या आजाराचा नागपूरकरांना धोका

Nagpur Health : नागपूरमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक ७४ असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीपेक्षा दीड पट जास्त आहे. यामुळे फुफ्फुसांचे आजार आणि हृदयविकारांचा धोका वाढला आहे.
Nagpur Health
Nagpur Healthsakal
Updated on

नागपूर : फुप्फुसांच्या विकाराचे प्रमाण जगभरात वाढत आहे. श्‍वास घेण्यात येणारा अडथळा हा क्रॉनिक ऑब्स्टक्‍टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) या गंभीर आजाराचे लक्षण असून, यामुळे फुफ्फुसाचा झटका येऊ शकतो.

जागतिक स्तरावर विविध कारणांनी दगावणाऱ्याचा दर ५ पैकी १ व्यक्तीच्या मृत्यूला फुफ्फुसाचा विकार कारणीभूत ठरतो. तर अलीकडेच नागपूरच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक ७४ नोंदविला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा दीड पट जास्त असल्याची माहिती अभ्यासातून पुढे आली आहे.

यावर्षी सर्वांसाठी स्वच्छ हवा आणि निरोगी फुप्फुसे ही थीम जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने पत्रकारांशी साधलेल्या संवादात मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी विभागाच्या श्वसन विकार विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी राज्यातील प्रमुख शहर असलेल्या नागपुरात वाढणाऱ्या वाहनांची संख्या भविष्यातील संकटाचा इशारा असल्याचे सांगितले.

येथील हवेच्या गुणवत्तेचा ऱ्हास होत आहे. वाहनांचे उत्सर्जन, औद्योगिक प्रदूषण, बांधकामे, बायोमास आणि घनकचरा जाळणे, हंगामी पीक जाळल्यामुळे नागपुरातील खराब हवेच्या गुणवत्तेमुळे येथील रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

आरोग्यासाठी जोखीम काय ?

  • वायू प्रदूषणामुळे वर्षाला अंदाजे ७ दशलक्ष व्यक्तींचा मृत्यू

  • धूम्रपान हे फुप्फुसाच्या कॅन्सरचे प्रमुख कारण

  • जवळजवळ ८५ मृत्यूसाठी धूम्रपान जबाबदार

  • श्वसन आजार मृत्यू आणि अपंगत्वाच्या प्रमुख कारणांपैकी एक

जगभरात दरवर्षी दगावणाऱ्या लोकसंख्येपैकी ३ दशलक्ष मृत्यू फुफ्फुसांच्या विकाराने होते. वायू प्रदूषण, धूम्रपान हे फुफ्फुसाचे शत्रू आहेत. वैयक्तिक वाहनांचा वापर कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीवर भर दिला पाहिजे. कमी अंतरासाठी सायकल चालवण्यास किंवा चालण्यासाठी प्रोत्साहित करणे देखील आवश्यक आहे.

-डॉ. सुशांत मेश्राम,विभागप्रमुख, पल्मोनरी,क्रिटिकल आणि स्लिप मेडिसिन, मेडिकल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.