Crime: मुलीच्या लग्नाच्या विषयावरून घरगुती वाद! लोखंडी पाईपने मारहाण केल्याने एकाचा मृत्यू

Crime: मुलीच्या लग्नाच्या विषयावरून घरगुती वाद! लोखंडी पाईपने मारहाण केल्याने एकाचा मृत्यू

मुलीच्या लग्नाच्या विषयावरून घरगुती वादातून लोखंडी पाईपने मारहाण केल्याने एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली.
Published on

Akola Crime News: शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देऊळगाव येथे मुलीच्या लग्नाच्या विषयावरून घरगुती वादातून लोखंडी पाईपने मारहाण केल्याने एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतकाचे नाव मंगेश आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात कलम ३२ प्रमाणे गुन्हा दाखल केला.


मिळालेल्या माहितीनुसार, पातूर तालुक्यातील देऊळगाव येथे ता. १६ डिसेंबर रोजी फिर्यादी मोहन सोनाजी उपर्वट यांच्या मुलाचा नातीच्या लग्नाच्या विषयावर बरेच दिवसापासून घरगुती वाद होता. या वादाचे रुपांत मारहाणीत झाले.

फिर्यादी मोहन उपर्वट, मुलगा मिलिंद हा गावातील हातपंपाजवळ उभा असताना विरोधी गटाचे परमेश्वर अशोक उपर्वट, प्रवीण अशोक उपर्वट, रामेश्वर अशोक उपर्वट, मिलिंद भीमराव उपर्वट यांनी मंगेश यास लोखंडी पाईपने जबर मारहाण केल्याने मंगेश हा घटनास्थळी गंभीर जखमी झाला.

जखमी अवस्थेत मंगेशला वडिलांनी उपचाराकरिता अकोला येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, उपचारादरम्यान मंगेशचा मृत्यू झाला. याबाबत ठाणेदार किशोर शेळके यांनी आरोपीविरोधात कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी एसडीओ गोकुळ राज यांनी भेट दिली. पुढील तपास ठाणेदार किशोर शेळके करीत आहेत. (Latest Marathi News)

Crime: मुलीच्या लग्नाच्या विषयावरून घरगुती वाद! लोखंडी पाईपने मारहाण केल्याने एकाचा मृत्यू
Accident News: ओव्हरटेक करत असतानात धावत्या कारवर आयशर टेम्पो कोसळला अन् काही क्षणातच अख्खं कुटुंबच संपलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()