अकोल्याच्या पोलिस निरीक्षकाने काढली विद्यार्थिनीची छेड; नंदनवन पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही नंदनवन परिसरात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असून तिथेच भाड्याने खोली घेऊन राहते.
akola police abuse girl case of molestation registered
akola police abuse girl case of molestation registeredSakal
Updated on

Nagpur News : नागपुरात स्पर्धा परीक्षेचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या बावीस वर्षीय तरुणीचा पाठलाग करीत, तिची छेड काढणाऱ्या अकोल्यातील खदान पोलिस ठाण्याच्या निरीक्षकाविरोधात नंदनवन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

धनंजय सायरे (वय ५३, रा. अकोला) असे आरोपी निरीक्षकाचे नाव आहे. पोलिस निरीक्षक सायरे मुळचा अमरावतीचा असून पीडिताही अमरावतीची राहणारी आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांना ओळखतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही नंदनवन परिसरात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असून तिथेच भाड्याने खोली घेऊन राहते.

दरम्यान रोज ती शिकवणी वर्गात ये-जा करते. काही महिन्यांपासून धनंजय सायरे तिच्या वडिलांमुळे संपर्कात आला. तेव्हा त्याने स्पर्धा परीक्षेसाठी हवी ती मदत करण्याचेही आश्‍वासन दिले. त्यामुळे त्यांचे बोलणे सुरू झाले.

तीन दिवसांपूर्वी त्यांनी तिला फोन करून मी अनेकांचे भविष्य घडविले असून तुझेही भविष्य उज्ज्वल करेल, त्यासाठी तुला माझ्यासोबत राहावे लागेल, मी तुझे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मार्गदर्शन करेल अशी बतावणी केली. मात्र, त्यात धनंजय यांच्या चारित्र्याबाबत संशय आल्याने तिने ही बाब आईला सांगितली. मात्र, त्यांनी याबाबत विचार न करता अभ्यासाकडे लक्ष देण्यास सांगितले.

यादरम्यान धनंजय यांनी पीडितेचे लोकेशन ट्रेस करून नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तिचे घर गाठले. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ती बाहेर निघताच, तिचा हात पकडून माझ्यासोबत राहा असे म्हणत छेड काढू लागला. युवतीने आरडाओरड केल्याने तो तेथून पसार झाला. त्यानंतर झालेला प्रकार मुलीने वडिलांना सांगितल्यावर त्यांनी नागपूर गाठले. शिवाय नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.