Akot Assembly Election 2024 :अकोटच्या लढतीत मतविभागणीची गुंतागुंत!

Akot Vidhan Sabha Election 2024 : मतदारसंघातील प्रत्येक लढती या तूल्यबळ व संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधणाऱ्याच ठरल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत तुल्यबळ लढतीची शक्यता
Akot Vidhan Sabha
Akot Vidhan Sabhasakal
Updated on

अकोट : विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार प्रकाश पाटील भारसाकळे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार महेश गणगणे या तूल्यबळ प्रतिस्पर्ध्यातील दुहेरी लढतीत मतविभागणीच निर्णायक ठरणार आहे. मतदारसंघ राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहे. विशेषतः या मतदारसंघातील प्रत्येक लढती या तूल्यबळ व संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधणाऱ्याच ठरल्या आहेत.

गत विधानसभा निवडणूक प्रकर्षाने गाजली ती दोन तूल्यबळ उमेदवारांच्या मतातील अल्प अशा अंतराने. त्यामुळेच या निवडणुकीत सुद्धा पुन्हा तीच स्थिती उद्भवली आहे. प्रकाश पाटील भारसाकळे आणि महेश गणगणे हे दोघे प्रतिस्पर्धी (२०१४ नंतर) पुन्हा रिंगणात आले आहेत.

महेश गणगणे यांनी प्रचाराचा अंतिम टप्प्यात अचानक उभारणी घेतल्याने ही लढत दुहेरी होणार असल्याचे जाणकार सांगत आहेत. तर एकमेकांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या या दोघांनी या निवडणुका अक्षरशः प्रतिष्ठेच्या बनविल्या आहेत. त्यामुळेच संपूर्ण मतदारसंघातील राजकीय वातावरण अक्षरशः पेटले आहे. प्रचार युद्धाच्या अंतिम टप्प्यात हे वातावरण कळस गाठणार व दोन प्रतिस्पर्ध्यांचे पडद्याआड व पडद्यावरील डावपेज मोठी गोंधळावस्था निर्माण करणार, असेही चित्र आहे.

या मतदारसंघातून महायुती व महाविकास आघाडीतील या तूल्यबळ लढतीत मतविभागणीच निर्णायक ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, स्वतंत्र भारत पक्ष, मनसे या चार पक्षांचे उमेदवार तसेच चार अपक्ष रिंगणात आहेत. यापैकी कोण कोणाच्या मतावर डल्ला मारणार, मत विभागणीस कारणीभूत ठरणार हा एक आज निरुत्तरीत प्रश्‍न आहे. या मतदारसंघात जाती पातीच्या राजकारणाचा, समीकरणाचा मोठा बोलबाला आहे. मराठा समाजासह अन्य ओबीसी प्रवर्गातील समाजाचे वेगवेगळ्या भागात प्राबल्य आहे.

Akot Vidhan Sabha
Nagpur East Assembly Election : पूर्व नागपूरच्या निवडणुकीत अपक्ष कुणाला देणार धक्का? चौरंगी लढतीने निवडणुकीत चुरस

कराव्या लागतील मोठ्या कसरती

छोट्या-मोठ्या प्रत्येक निवडणुकीत जाती-पातीची गणितेच प्राधान्याने यश, अपयशास कारणीभूत ठरली आहे. या सार्वत्रिक निवडणुकीत सुद्धा जाती-पातीची गणितेच प्रभावी ठरणार हे स्पष्ट आहे. त्यामुळेच आमदार प्रकाश पाटील भारसाकळे आणि महेश गणगणे हे दोघे तूल्यबळ प्रतिस्पर्धी मोठ्या सावधपणे भूमिका घेवून डावपेज खेळतांना दिसत आहेत.

या दोन प्रतिस्पर्ध्यांना स्वतःच्या वोट बँका राखतेवेळी व एकमेकांच्या वोट बँकांवर डल्ला मारतेवेळी मोठ्या कसरती कराव्या लागत आहेत. त्यातच वंचित बहुजन आघाडी असो, मनसे वा अपक्ष यांच्या मतविभागणीच्या खेळ्या या दोघांसाठी अडचणीच्या आणि धोकादायक ठरू लागल्या आहेत. त्यामुळेच मतविभागणीची गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत आहे. प्रचार युद्धाच्या अंतिम टप्प्यात मतविभागणीचे वरकरणी दिसणारे चित्र गडद होईल, असे संकेत आहेत.

Akot Vidhan Sabha
Hingoli Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांत ‘कांटे की टक्कर’ कोण होणार आमदार..?

मतदारांना गृहीत धरणे भोवणार?

अकोट विधानसभा मतदार संघात लोकसभेवेळी मतदारांना गृहीत धरण्यात आले होते. विद्यमान आमदारांनी त्या-त्या भागात केलेली विकासकामे पक्षांच्या उमेदवारांना भोवणार असून, मतदारांना गृहीत धरल्यास पुन्हा फटका बसण्याची शक्यता आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.