मातापित्याचे छत्र गेल्याने चारही मुली अनाथ; उईके कुटुंबावर काळाची झडप

मातापित्याचे छत्र गेल्याने चारही मुली अनाथ; उईके कुटुंबावर काळाची झडप
Updated on

मेंढला (जि. नागपूर) : नरखेड तालुक्यातील शेवटच्या टोकावर म्हणजेच डोंगरा भागात बसलेलं रामपुरी हे छोटस गाव. येथील रेखा विनायक उईके यांचे दोन वर्षांआधी आजाराने निधन झाले. आई गेल्याने मुलींनी वाडिलांना धरून कसाबसा संसार चलावला. आईच्या जाण्याच्या वेदना सहन करीत दोन वर्ष काढले असतानाच कोरोनाने (coronavirus) विनायक उईके याचे निधन झाले. (All four daughters are orphaned due to the loss of their parents)

आई गेल्यावर कसेबसे शिक्षण वडिलांच्या भरवषयवर सुरू होते. मात्र, घरी दोन वेळची भाकर कमावणारे वडील गेल्याने चारही मुलींच्या तोंडचा घास हिसकल्यासारखी ही घटना घडली. चारही मुली पोरख्या झाल्या असून त्यांचे शिक्षणाचे स्वप्न साकार होणं शक्य नसल्याने त्यांच्याकडे आता विळा येणार आहे असे दिसू लागले.

मयूर उमरकर यांना माहिती कळताच त्यांनी उईके कुटुंबाची सांत्वन भेट घेतली व वेळवेळी सहकार्य करण्याचे आस्वासन दिले. यावेळी उपस्थित सरपंच गौतम इंगळे, श्रावणजी बागडे, हेमराज चौधरी, तलाठी वाहने, सचिव गिरीपुंजे उपसरपंच संदीप कोहळे आदी उपस्थित होते.

मातापित्याचे छत्र गेल्याने चारही मुली अनाथ; उईके कुटुंबावर काळाची झडप
चंद्रशेखर बावनकुळे अचानक मौनात! राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा
उईके कुटुंबीयांना शासनाकडून जे काही मदत होईल ते मिळवून देण्यासाठी, अर्थ साह्य योजनेमधून २० हजार रुपयांची तातडीने मदत व प्रत्येक मुलीला संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत एक हजार रुपये महिन्याचा लाभ शासनाकडून मिळवून देण्यासाठी तहसीलदार यांना पाठपुरावा करून योग्य ती मदत मिळून देण्यासाठी आश्वासन दिले. चारही मुलींच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी मी स्वतः माझ्या महाविद्यल्यातून करील. त्यांना नोकरी लावून देण्यासाठी सुद्धा सलील देशमुख जिल्हा परिषद सदस्य नागपूर यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे.
- मयूर उमरकर, पंचायत समिती सदस्य, नरखेड

(All four daughters are orphaned due to the loss of their parents)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.