National meeting for Traders : व्यापाऱ्यांची राष्ट्रीय बैठक नागपुरात

देशभरातील व्यापाऱ्यांनी भविष्यात डिजिटल पद्धतीने व्यवसाय कसा करावा, बँकांकडून कर्ज घेण्यासाठी कागदपत्रे कशी असावीत, ऑनलाइन माहिती कशी द्यावी, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर व्यवसायात कसा करावा या सर्व बाबी लक्षात घेऊन अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघ (कॅट) पुढाकाराने नागपुरात देशभरातील व्यापाऱ्यांच्या संमेलनाचे आयोजन केले आहे.
National meeting for Traders :
National meeting for Traders :sakal
Updated on

नागपूर : देशभरातील व्यापाऱ्यांनी भविष्यात डिजिटल पद्धतीने व्यवसाय कसा करावा, बँकांकडून कर्ज घेण्यासाठी कागदपत्रे कशी असावीत, ऑनलाइन माहिती कशी द्यावी, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर व्यवसायात कसा करावा या सर्व बाबी लक्षात घेऊन अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघ (कॅट) पुढाकाराने नागपुरात देशभरातील व्यापाऱ्यांच्या संमेलनाचे आयोजन केले आहे. २१ आणि २२ ऑगस्टला हे संमेलन होणार आहे, अशी माहिती कॅटचे अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी दिली.

या दोन दिवसीय बैठकीत देशभरातील व्यापारी संघटना अधिक मजबूत करून कॅटच्या सदस्यांचा व्यापार वाढवण्यासाठी सहकार्य करणे. देशातील सर्व राज्यांमधील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी जाळे तयार करणे. व्यापाऱ्यांच्या समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी सातत्याने काम करावे लागणार आहे.

तसेच व्यापाऱ्यांना नवीन व्यवसाय संधींची माहिती घ्यावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपले स्थान निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या तयारीबद्दलही मार्गदर्शन येथे करण्यात येणार आहे. या सर्व मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करण्यासाठी कॅटचे ​​सरचिटणीस आणि खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी दोन दिवसीय बैठकीसाठी व्यावसायिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.