Amravati Crime News: शहरातील तीन व्यापाऱ्यांना तोतयांनी विविध प्रकारचे आमिष दाखवून त्यांची ११ लाख ८१ हजार ७६२ रुपयांनी फसवणूक केली. तिघांच्याही तक्रारीवरून शहर सायबर पोलिसांनी विश्वासघात व फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहे.
कंत्राटदार श्रीकांत काळोले (वय ७१) यांनी गोवा येथे जायचे असल्यामुळे त्यांनी गुगलवरून ऑनलाइन पद्धतीने विवांता ताज हॉटेलचा कस्टमर केअर नंबर सर्च केला. सदर क्रमांकावर काळोले यांनी संपर्क साधून हॉटेलमधील बुकिंगकरिता विचारणा केली. त्याकरिता संपर्क करणाऱ्या व्यक्तीने रूम बुक करण्याच्या नावाखाली काळोले यांना विविध यूपीआय आयडी व बँकखाते क्रमांक पाठवून त्या खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले.
काळोले यांनी तोतयाने दिलेल्या यूपीआय आयडी व बँकखात्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने ४ लाख ५० हजार ३९६ रुपयांचा भरणा केला. आपली फसवणूक झाल्याचे कळताच श्री. काळोले यांनी सायबर ठाण्यात तक्रार दिली असता हा गुन्हा दाखल झाला.
दुसऱ्या घटनेमध्ये शहरातील व्यावसायिक मनोज किशोरचंद्र शाह (वय ५२) यांच्यासोबत टेलिग्राम अकाउंट व ओळख झालेल्या व्यक्तीने काही ऑफर दिली. टेलिग्राम अॅपवरून काही टास्क पाठवून ते पूर्ण केल्यास कमी वेळेत अधिक कमिशन व इतर मोबदला दिल्या जाईल, असे आमिष दाखविले. त्यासाठी टास्क पाठवून काही यूपीआय आयडी व बँक खातेक्रमांक पाठवून त्यामध्ये पैसे भरण्यास सांगितले. (Latest Marathi News)
शाह यांनी सांगितल्याप्रमाणे ३ लाख ९० हजार रुपये ऑनलाइन पाठविले. परंतु निर्धारित वेळेत लाभ मिळाला नाही. तोतयाने फसवणूक केल्याच्या मनोज शाह यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तिसऱ्या घटनेत गणेशलाल अमरलाल उदासी यांच्यासोबत अनोळखी व्यक्तीने संपर्क साधून त्यांचे क्रेडिट कार्ड खूप दिवसांपासून न वापरल्यामुळे बंद होईल, अशी बतावणी केली. संबंधिताने उदासी यांच्याकडून क्रेडिट कार्डचा नंबर व इतर आवश्यक ती माहिती विचारली. एवढेच नव्हे तर उदासी यांनी त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबरसुद्धा शेअर केला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून ३ लाख ४९ हजार ३६६ रुपये एवढी रक्कम ऑनलाइन कुणीतरी दुसऱ्या खात्यात वळती करून फसवणूक केली. उदासी यांनी फसवणूक झाल्याची तक्रार सायबर ठाण्यात नोंदविताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.