Amravati : शाळेचा चेहरामोहरा बदलविणारा ध्येयवेडा शिक्षक

नयन काळपांडे यांच्या प्रयत्नांनी सैदापूरच्या जि. प. शाळाने टाकली कात
amravati news
amravati news sakal
Updated on

अमरावती - जिल्ह्यात १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १४८ शाळा आहेत. असे असतानाही आशा न सोडता काही मोजकेच शिक्षक आपल्या प्रयत्नांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देताहेत.

चांदूरबाजार तालुक्यातील फुबगाव सैदापूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची सुद्धा अशीच अनास्था होती. तेथे कार्यरत मुख्याध्यापक नयन काळपांडे यांनी शाळेला गतवैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प केला आणि त्यांच्या प्रयत्नांतून आज ही शाळा गावातील प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटावा, अशी बनली आहे.

amravati news
Jalna Maratha Protest: Manoj Jarange संतापले, Devendra Fadnavis यांच्या राजीनाम्याची मागणी, Eknath shinde यांना इशारा

विद्यार्थ्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी प्रथम सुरू केला. जिल्हा परिषदेने २०१८ मध्ये शाळेची इमारत बांधली असली तरी विजेची व्यवस्था नसल्याने टीव्ही व पंखे तसेच धूळखात पडले होते. समग्र शिक्षा अभियानातून आलेला काही निधी आणि स्वतःजवळील पैसे टाकत मुख्याध्यापक काळपांडे यांनी भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या.

amravati news
Nagpur Crime News : भाजी कापण्याच्या चाकूने सासूवर सपासप वार

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष शिल्पा किटुकले, सरपंच संजय किटुकले, ग्रामपंचायत सदस्य शिवदास पळसपगार, शैलेंद्र किटुकले यांच्या पुढाकारातून एका कंपनीच्या सहकार्यातून शाळेवर सौरऊर्जेचे स्रोत मिळविले. त्यामुळे वीजबिलाची समस्या निकाली निघाली. तसेच शाळेतील भिंतींवर आकर्षक छायाचित्रे काढली.

सोबतच परसबाग, वृक्षलागवडीसारखे उपक्रम विद्यार्थी व अन्य शिक्षकांच्या सहकार्याने राबविले.

पाण्याचे महत्त्व जाणून शाळेच्या इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग केले. शाळेतील दोन एकर शेती मनरेगामध्ये दोन वर्षांसाठी देऊन शेतात फळबाग लावण्यात आली. आता तर सरपंच संजय किटुकले यांच्या निधीतून शाळेला संगणक देण्यात येत असून शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न मुख्याध्यापक श्री. काळपांडे, शिल्पा किटुकले, शिक्षक सुभाष घटाले, सुवर्णा देशमुख, कल्पना आसलकर, गजानन लेडे आदी सहकारी करीत आहेत.

amravati news
Pune Municipal Hospital : पुणे पालिका रुग्णालयांना मिळणार ‘डोस’; खाटांची संख्या वाढणार

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक व शिक्षणाचा दर्जा हा अतिशय उत्तम आहे. केवळ काही सुविधा उपलब्ध करून दिल्यास जिल्हा परिषदेच्या शाळांना गतवैभव प्राप्त करून देणे कठीण नाही, मात्र त्यासाठी लोकप्रतिनिधी व समाजाने समोर आले पाहिजे.

- नयन काळपांडे, मुख्याध्यापक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.