Amravati Nagpur National Highway: अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या ट्रॅव्हल्सवर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणात तपास करत आहेत.(Amravati Nagpur natinal highway Firing at Private Travels culprits where in Bolero 4 Injured)
अमरावती- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रात्री अकरा वाजताच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्सवर गोळीबार करण्यात आलाय. अमरावतीकडून नागपूरकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा एका बोलेरो वाहनाने पाठलाग केला. त्यानंतर बुलेरोमधील काही लोकांनी ट्रॅव्हल्सच्या चालकाच्या दिशेने गोळीबार केला. चित्रपटात शोभेल असाच हा प्रसंग होता. (crime news in amrawati-nagpur)
मिळालेल्या माहितीनुसार या गोळीबारात चारजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. महामार्गावरुन हजारोंच्या संख्येने वाहने येत जात राहतात. त्यामुळे असा पाठलाग करुन गोळीबार करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ पोलीस स्टेशनं हद्दीतील अमरावती ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळविहीर ते शिवणगाव जवळ एका ट्रॅव्हल्सवर गोळीबार झाला. घटना दि.10 रोजी रात्री 10:30 वाजताच्या दरम्यान घडली. गोळीबारमध्ये चालकासह एकजण जखमी असून जखमीवर तिवसा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. चालक खोमदेव कवळे (वय 45) राकेश कनेर (वय 30) असे जखमीचे नाव असून सर्व नागपूर मानेवाडा येथील रहिवाशी आहे.
नागपूरवरून एमएच 14 जिडी 6955या क्रमांकाच्या ट्रॅव्हलर गाडीने शेगाववरून दर्शन करून येत असताना पिंपळविहीर ते शिवणगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एका बोलेरो गाडीतील मद्यधुंद असलेल्या काही लोकांनी चालत्या गाडीवर गोळीबार केला.या गोळीबारात चालकाच्या हाताला स्पर्श करून गोळी गेल्याने चालक थोडक्यात बचावला तर राकेश कनेर या युवकांच्या खांद्याला लागून गेल्याने किरकोळ जखमी झाला.
अचानक झालेल्या गोळीबारामुळे गाडीत असलेल्या लोकांनी नजीकचे तिवसा पोलीस स्टेशन गाठून सर्व घटना पोलिसांसमोर मांडली. यावेळी तिवसा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जखमीवर तिवसा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु केले असून गोळीबार करणाऱ्याच्या मार्गावर पोलीस रवाना झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.