धक्कादायक माहिती : दिवसाला सरासरी २५ चिमुकले कोरोनाबाधित

धक्कादायक माहिती : दिवसाला सरासरी २५ चिमुकले कोरोनाबाधित
Updated on

नागपूर : कोरोना (coronavirus) शहरात दाखल झाल्यापासून यंदा एप्रिलपर्यंत दिवसाला सरासरी २५ चिमुकले बाधित झाल्याची धक्कादायक माहिती आकडेवारीतून पुढे आली आहे. मार्च २०२० ते एप्रिल २०२१ या चौदा महिन्यांत १० वर्षांखालील १० हजार ८२३ मुलांना कोरोना झाला. भविष्यातील तिसऱ्या लाटेतही (corona The third wave) मुले कोरोनाच्या कवेत येण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने पुढेही पालकांच्या जिवाला घोर कायम राहणार असल्याचे चित्र आहे. (An average of 25 child a day infect the corona)

शहराची एकूण बाधितांची संख्या आज ३ लाख २६ हजार ८३५ पर्यंत गेली आहे. महापालिकेने मागील मार्च २०२० ते एप्रिल २०२१ पर्यंतच्या दिलेल्या आकडेवारीनुसार शहरात कुमारवयीन, तरुण, ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर १० वर्षांखालील चिमुकल्यांनाही कोरोनाने कवेत घेतल्याचे दिसून येत आहे. या चौदा महिन्यांच्या काळात महापालिकेने शहरात एकूण २ लाख ९६ हजार ४०२ बाधितांची नोंद केली.

धक्कादायक माहिती : दिवसाला सरासरी २५ चिमुकले कोरोनाबाधित
वर्धेत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी; कोरोनावर केली होती मात

विशेष म्हणजे दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात कोरोनाने चांगलेच थैमान घातले. या एका महिन्यांत १ लाख १८ हजार ३४८ बाधित आढळून आले. दुसऱ्या लाटेत मार्च व एप्रिलमध्ये चिमुकल्यांचाही समावेश आहे. परंतु, पहिल्या लाटेतही मागील वर्षी अनेक चिमुकल्यांना कोरोनाने कवेत घेतले होते. परंतु त्या काळातील संख्या कमी असली तरी गेल्या चौदा महिन्यातील सरासरी बघितल्यास दररोज २५ चिमुकले कोरोनाने बाधित झाल्याचे दिसून येत आहे.

तिसऱ्या लाटेत मुलांवरील उपचारासाठी कृती आराखडा ठरविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृती दलाने झटपट आराखडा तयार केला असून आरोग्य विभागाला सादर करण्यात आल्याचे सूत्राने नमुद केले. या आराखड्यात चिमुकल्यांच्या वॉर्डात किती बालरोग तज्ज्ञ राहतील, त्यांची ड्यूटी किती तास राहील, लोकसंख्येनुसार मुलांसाठी किती खाटा हव्या, याबाबत माहिती देण्यात आली असल्याचे सूत्राने नमुद केले. त्यामुळे तिसऱ्या लाटेत चिमुकल्यांना जपण्याची अधिक जबाबदारी पालकांवर राहणार आहे.

धक्कादायक माहिती : दिवसाला सरासरी २५ चिमुकले कोरोनाबाधित
मोठी बातमी : तीन मुलींचा वैनगंगा नदीमध्ये बुडून करूण अंत

चौदा महिन्यांतील बाधितांची संख्या

वय बाधित

१० वर्षांखालील १०,८२३

११-२० २२,५२५

२१-३० ५६९१५

३१-४० ६३,२५६

४१-५० ५३६०६

५१-६० ४६०९८

६१-७० २७,५१३

७१-८० १२०७८

८१-९० ३२४६

९१-१०० ३१९

(आकडेवारी मार्च २०२० ते एप्रिल २०२१ पर्यंतची आहे)

(An average of 25 child a day infect the corona)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.