नागपूर : महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी आपल्यावर भाजपने दबाव टाकला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरोधात खोटे शपथपत्र लिहिण्यास सांगण्यात आले होते. त्यास नकार दिल्याने तुरुंगात टाकण्यात आले होते,’ असे आरोप यापूर्वीच माजी गृहमंत्री आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील नेते अनिल देशमुख यांनी केले होते.