Nagpur News : मोकाट श्‍वान प्रकरणात आता ॲनिमल वेल्फेअर बोर्डाची मध्यस्थी

तीन आठवड्यांचा अवधी; पुढील कारवाईच्या दृष्टीने बोर्डाच्या सूचना ठरणार महत्त्वाच्या
Animal Welfare Board intervenes in street dog case nagpur bench
Animal Welfare Board intervenes in street dog case nagpur benchSakal
Updated on

Nagpur News : शहरातील मोकाट श्‍वानांच्या प्रकरणात आता ॲनिमल वेल्फेअर बोर्ड मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मध्यस्थी अर्ज दाखल करणार आहे. त्यासाठी उच्च न्यायालयाने बोर्डाला तीन आठवड्यांचा अवधी दिला.

पकडलेल्या श्‍वानांना डांबण्यासाठी शहराबाहेर जिल्हाधिकाऱ्यांनी चार जागा निश्‍चित केल्या आहेत. पुढील कारवाईच्या दृष्टीने बोर्डाच्या सूचना महत्त्वाच्या ठरणार आहेत.शहरातील मोकाट श्‍वानांच्या हैदोसावर मनोज तालेवार आणि मनोज शाक्य यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली जनहित याचिका प्रलंबित आहे.

या प्रकरणी न्यायमूर्ती विभा कनकनवाडी आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या प्रकरणावर न्यायालयाने वेळोवेळी अनेक आदेश दिलेत. श्वानांसाठी निवारा घर बांधले जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शहराबाहेर जागा सुचवाव्यात असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यांनी जिल्ह्यातील ४७ जागा सुचविल्या.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या जागांची संयुक्त पाहणी करण्यात आली. यामध्ये, याचिकाकर्ते मनोज तालेवार, अनिरुद्ध गुप्ते, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. मोहन खंडारे, महापालिकेचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांचा समावेश होता.

यामध्ये दुधाबर्डी (४६ किमी, ता. सावनेर), तिष्टी (६० किमी, ता. कळमेश्‍वर), तोंडखैरी (२३ किमी, ता. कळमेश्‍वर), तोंडखैरी (२३ किमी, ता. कळमेश्‍वर) येथील चार जागा निश्‍चित करण्यात आल्या आहे.

स्थानिक प्राधिकरणांनी (मनपा, नासुप्र, नगरपंचायत, ग्रामपंचायत) या जागांबाबत निर्णय घेऊन तेथे मोकाट कुत्र्यांना डांबण्यासाठी निवारा घर बांधण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. या सर्व पुढील प्रक्रियेसाठी ॲनिमल वेल्फेअर बोर्ड सूचना देणार आहेत. पुढील सुनावणी २२ जुलै रोजी निश्‍चित केली. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. फिरदोस मिर्झा व ॲनिमल वेल्फेअर बोर्डातर्फे डेप्युटी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया नंदेश देशपांडे यांनी बाजू मांडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.