Superstition : भोंदू बाबाच्या नादात पुन्हा एका महिलेचा बळी,सर्पदंशानंतर जडीबुटीच्या उपचारांचा दावा

Snakebite : शितलवाडी येथे सर्पदंशानंतर जडीबुटीच्या उपचारांचा दावा करणाऱ्या भोंदू बाबाकडे उपचार घेणाऱ्या बयाबाई मरसकोल्हे यांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात सर्पदंशानंतर भोंदूगिरीचा अजूनही बळी जात असल्याचे हे आणखी एक उदाहरण आहे.
snakebite nagpur Superstition death
snakebite sakal
Updated on

शितलवाडी : ग्रामीण भागात सर्पदंश झाल्यावर मांत्रिक भोंदूबाबाकडे जाण्याची परंपरा कायम असून सर्पदंश होऊन जडीबुटींद्वारे उपचाराचा दावा करणाऱ्या तथाकथित मांत्रिकांना गावकरी बळी पडत आहेत.

असाच आणखी एक प्रकार सोमवारी (ता.७) देवलापार जवळील खिडकी गावात उघडकीस आला. सर्पदंश झालेल्या महिलेवर दवाखान्याऐवजी तिच्यावर जडीबुटीचा उपचार करण्यास बाध्य केल्यामुळे महिलेला जीव गमवावा लागला. मृत महिलेचे नाव बयाबाई मरसकोल्हे (वय ५५, खिडकी देवलापार) असे आहे.

माहितीनुसार, सोमवारी सकाळी ११ वाजता बयाबाई या पारशिवनी तालुक्यातील सोनेगाव येथील विजय ठाकरे यांच्या शेतात काम करीत होत्या. यावेळी त्यांच्या डाव्या पायाला विषारी घोणस प्रजातीचा साप चावला. गावातील ग्रामपंचायत सदस्य वैभव काळमेघ यांनी घटनेची माहिती सर्पमित्र व वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटीचे सचिव नितीश भांदक्कर यांना दिली. महिलेच्या पायाला सूज आल्याचे समजल्यानंतर घोणस सापाची भीती दाखवून महिलेला रुग्णाला रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.

काळमेघ यांनी बयाबाई यांना दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलेच्या कुटुंबियांनी तिला रामटेक येथील हिवरा गावात राहणाऱ्या कथित मांत्रिकाकडे जडीबुटीच्या उपचारासाठी नेले. उपचार करीत असताना शेतकऱ्याच्या शेतावर देव नाराज आतहे, त्यामुळे तुम्हाला शेतात साप चावला आहे.

त्यासाठी शेतावर पूजा करावी लागणार, अशी मांत्रिकाकडून बतावणी करण्यात आली. त्यानंतर शेतात पूजा-अर्चना झाल्यानंतर मांत्रिकाने बयाबाई धोक्याबाहेर असल्याचा दावा केला आणि रुग्णाला घरी नेण्याचा सल्ला दिला. मात्र मंगळवारी (ता.८) सकाळी बयाबाईंचा त्रास वाढला व नंतर त्यांचा मृत्यू झाला.

एक महिन्यातील तिसरी घटना

याआधीही ९ सप्टेंबरला कल्पना बोंदरे (वय ४०, मौदा, खंडाळा) यांच्यावर वनौषधीचा उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर २८सप्टेंबर रोजी कुही येथील तुळजाबाई क्षीरसागर(वय ६२) यांचाही सर्पदंशावर औषधोपचार करण्यास उशीर झाल्यामुळे मृत्यू झाला होता. पुन्हा भोंदूबाबाच्या नादी लागून पुन्हा खिडकी येथील एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

अनेक गावांमध्ये सर्पदंश झाल्यानंतर भोंदूबाबा मंत्र आणि औषधी वनस्पतींनी तो बरा करण्याचा दावा करतात. गेल्या महिन्यातही सर्पदंशानंतर औषधोपचारामुळे दोन महिलांना जीव गमवावा लागला होता. अशा गंभीर प्रकरणांबाबत जनजागृती करण्याबरोबरच उपचाराच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

-नितीश भांडक्कर, सचिव, वन्यजीव कल्याण सोसायटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.