Nagpur : दुचाकी चालविताना मोजता येणार ‘नेक व्हायब्रेशन’, नागपूरच्या लेकीचे संशोधन

अपूर्वा उईके या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचे संशोधन
helmet
helmetesakal
Updated on

मंगेश गोमासे

Nagpur : शहरात वाहन चालविताना रस्त्यावर अनेक ठिकाणी गतीरोधक व खड्डे आढळून येतात. या खड्ड्यांमुळे अनेकांना मनक्याचा त्रास होतो. मात्र, कोणत्या रस्त्यावर किती ब्रेकर आहेत, त्याचे नेक व्हायब्रेशन किती व त्यातून किती प्रमाणात हा त्रास होऊ शकतो हे मोजणारे यंत्र प्रियदर्शिनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने तयार केले आहे.

अपूर्वा उईके असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती एमटेक अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे गतीरोधक असल्याचे दिसून येते. इंडियन रोड काँग्रेसने याबाबत विशिष्ट मानक दिले आहेत. मात्र, त्याचे पालन होताना दिसून येत नाही. त्यामुळे अनेक रस्त्यांवर मानकानुसार गतीरोधक तयार होत नाही.

त्यासाठी रस्त्यावर ब्रेकर आहे, असे फलकही लावण्यात येत नाही. त्यामुळे अनेकदा स्पीडमध्ये वाहन असताना मध्येच गतीरोधक आल्यावर अपघात वा मनक्याला झटका पडून त्यातून पाठीचे आजार सुरू होतात. अशावेळी वाहनाची गती व रस्त्यावरचे ‘नेक व्हायब्रेशन’ किती आहे, याबाबत माहिती असणे गरजेचे असते. ही बाब लक्षात घेऊन अपूर्वाने रस्त्यामुळे होणाऱ्या दुचाकी वाहनांचे कंपन व त्यामुळे मानव शरीरावर होणारे परिणाम याबाबत संशोधनास सुरुवात केली.

helmet
Nagpur : पॉलिमार दप्तरावरून मुख्याध्यापकांना धरले धारेवर

यासाठी मार्गदर्शक डॉ. गिरीश मेहता, डॉ. सागर शेलारे यांनी मदत केली. विशेष म्हणजे, अपूर्वाचे मार्गदर्शक डॉ. मेहता यांना स्लीप डिस्क हा आजार झाला होता. त्यामुळे अपूर्वाला संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली. तिने मेहता यांच्या सल्ल्याने ‘नेक व्हायब्रेशन डिव्हाईस’ तयार केले. त्यासाठी खापेकर यांची मदत घेतली. तसेच विविध चालकांवर प्रयोग केले. त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या. या प्रयोगाचे प्राचार्य डॉ. एस. ए. ढाले आणि विभागप्रमुख डॉ. आय. ए. खान यांनी कौतूक केले.

हे आढळले संशोधनात

अपूर्वा उईके हिने केलेल्या प्रयोगामध्ये विविध रस्त्यांवरील गतीरोधक, रोड पॅचेस, डांबरी व क्राँक्रिट रस्त्याचा समावेश केला. त्यात डांबरी रस्त्याच्या ‘डम्पिंग इफेक्ट’मुळे नेक व्हायब्रेशन कमी होतात. तर सिमेट रस्त्यावर त्याचे प्रमाण अधिक असल्याचेही आढळून आले. तसेच वाहनाची गती जास्त असेल तर गतीरोधकामुळे मानेवर जास्त तनाव येतो असे आढळून आले.

helmet
Neck Pain : आखडलेली मान अशी करा सरळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.