Nagpur Drug Smuggling : एएसआयची एमडी तस्कराकडून वसुली

Nagpur Drug Smuggling : एमडी तस्कराकडून वसुली केल्याच्या आरोपावरून सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सिद्धार्थ पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे नागपूरच्या अंमली पदार्थविरोधी पथकात मोठी खळबळ उडाली आहे.
Crime News
Crime Newssakal
Updated on

नागपूर : एमडी तस्करांशी संबंध ठेवून त्याच्याकडून वसुली करणाऱ्या साहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी निलंबित केले आहे. यामुळे अंमली पदार्थविरोधी पथकासह इतर गुन्हे शाखेच्या पथकांमध्ये खळबळ उडाली आहे.

सिद्धार्थ पाटील असे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो सध्या मुख्यालयात तैनात असून यापूर्वी तो अंमली पदार्थविरोधी पथकात होता. पोलिस आयुक्तांनी काही महिन्यांपासून ‘नशामुक्त नागपूर’ अभियान सुरू केले आहे. पथकाने ऑगस्टमध्ये महानगरपालिकेच्या आरोग्यविभागात कर्मचारी असलेल्या कपिल गंगाधर खोब्रागडे, अक्षय बंडू वंजारी, राजेश अनंतराव गिरी या तीन आरोपींना अटक केली होती.

त्यांच्याकडून सुमारे ९० लाखांचे एमडीही जप्त केले होते. तपासात त्यांनी गोलू बोरकर, अक्षय बोबडे, सोहेल व अन्य एकाला आरोपी बनवून त्याचा शोध सुरू केला होता. विशेष म्हणजे, पोलिसांच्या चौकशीत कपिल खरेदी केलेली एमडी राकेश गिरी आणि अक्षयच्या माध्यमातून शहरातील विविध भागात विक्रीसाठी द्यायचा. त्यातून राकेश मकसूद अमीनुद्दीन मलिक (रा. टेका, ताज नगर) या कुख्यात एमडी तस्कराला एमडीची विक्री करायचा.

मकसूदही खरेदी केलेली एमडी हिंगण्यात राहणारा अक्षय बोबडे आणि अल्लारख्खा याला विक्री करायचा. याशिवाय अक्षय बोबडेद्वारे गोलू बोरकर (रा. हिवरीनगर, नंदनवन) याला एमडीची विक्री करायचे. दरम्यान पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी फास आवळला असता सिद्धार्थ पाटील याने त्याच्यावर कारवाई न करता, त्याच्याकडून पैशाची वसुली सुरू केली. पाटील यांची चौकशी सुरू केल्यावर त्यात त्याने पैसे घेतल्याचे निदर्शनास येताच, पोलिस आयुक्तांनी त्यांचे निलंबन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.